जाम तुकुम चे सरपंच भालचंद्र बोदलकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
विजय जाधव:-
नांदगाव/प्रतिनिधी -- काही तरी वेगळ करणारी माणस ही वेगळी असतात त्यांचे ध्येय, तत्व, विचार जरा हटके असतात, त्यामध्ये असे व्यक्तीमत्व असणारे पोंभुर्णा तालुक्यातील जाम तुकुम ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर तरूण आणि तडफदार सरपंच भालचंद्र बोधलकर. यांचा 1 जून रोजी वाढदिवस.
काही व्यक्तींच्या रक्तातच मुळात लढवय्यापणा आणि संघर्ष करण्याची मोठी ताकद असते. त्यामुळे अशी मंडळी आव्हानाला आव्हान करून सामोरे जातात. यशापयशाची पर्वा न करता सातत्याने मार्गक्रमण करत असतात. असे मत शनिवारी ता.1जुन रोजी सरपंच भालचंद्र बोधलकर यांच्या वाढदिवसानिमिताने पोंभुर्णा तालुका पत्रकारांनी नांदगाव येथे वाढदिवस कार्यक्रमानिमित्त उपस्थित पत्रकारांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी चंद्रपूर जिल्हा पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा महासचिव माजी सरपंच जीवनदास गेडाम, नांदगाव चे माजी उपसरपंच तथा दरारा 24 तास चे प्रतिनिधी विजयराव जाधव,श्रीनिवास पबावार यांच्यासह जेष्ठ नागरिक, विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक उपस्तित होते.
यावेळी सरपंच भालचंद्र बोधनकर यांनी आपले मत व्यक्त करताना घरकुलांचा मुद्दा उपस्थित केला. घरकुलाचा निधी अडीच लाख रुपये सरकारने करावा अशी त्यांनी मागणी केली. त्याचबरोबर घरकुलधारकांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी अशी सुद्धा त्यांनी यावेळी मागणी केली आहे.
यावेळी येथील नागरिकांनी बोलताना सांगितले की, भालचंद्र बोधलकर यांना उदंड आयुष्य लाभावेत तसेच पुढील काळात ते जिल्हा परिषद निवडणूक लढवावी असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले. यावेळी नागरिकांनी सरपंच भालचंद्र बोधलकर यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
0 Comments