Ticker

6/recent/ticker-posts

आजपासून ४ जून पर्यंत.. फक्त एवढं करा! - ज्ञानेश वाकुडकर



आजपासून ४ जून पर्यंत..
फक्त एवढं करा!
-
ज्ञानेश वाकुडकर
~~~
जिथं असाल तिथून, जसं जमेल तसं, जेवढं जमेल तेवढं.. ४ जून पर्यंत खाली दिल्याप्रमाणे करा. कारण..
आपला देश धोक्यात आहे. लोकशाही धोक्यात आहे. संविधान धोक्यात आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य धोक्यात आहे.
कृपया खालील गोष्टी काळजीपूर्वक वाचा. विचार करा. कृती करा..!
१. ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात वादग्रस्त आणि संवेदनशील निवडणूक आहे. 
२. या निवडणुकीत आपली लोकशाही, संविधान आणि देशाचे अस्तित्व देखिल धोक्यात आहे.
३. विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. ते २०१४ पासून सत्ताधाऱ्यांनी जवळपास उध्वस्त करून टाकले आहेत.
४. निवडणूक आयोगाच्या गळ्यात कुणाचा खाजगी पट्टा बांधला आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. आयोगातील महत्त्वाचे शिलेदार तुकडेवारी विकले गेले आहेत, अशी लोकांची भावना आहे. 
५. अशा संवेदनशील वेळी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विदेशात सुटीवर गेलेले आहेत. पण आपल्याला मात आपला देश असा वाऱ्यावर सोडता येणार नाही. 
६. संसदेची सुरक्षाव्यवस्था अचानक बदलली गेली आहे. आर्मी चिफ यांना नियमबाह्य मुदतवाढ दिली आहे. अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या मनमानी पद्धतीने आणि कायदा व आचार संहिता धाब्यावर बसवून करण्यात आलेल्या आहेत. हा सारा घटनाक्रम संशयास्पद आहे.
७. या अघोषित हुकुमशाहीबद्दल, दडपशाहीबद्दल जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे. सारा देश आतल्या आत धगधगतो आहे. खुद्द देशद्रोह्यांच्या टोळीतही मोठी फूट पडली आहे. दोन्ही गट एकमेकांचा गेम करायला टपून बसले आहेत. त्यामुळे टोळीचे म्होरकेही मनातून हादरलेले आहेत.
८. मात्र, या देशाचा सातबारा कोणत्याही दलालाच्या किंवा त्याच्या बापाच्या नावावर नाही. १४० कोटी लोकांचा हा देश आहे. आपण या देशाचे मालक आहोत. म्हणूनच हा देश वाचवण्याची जबाबदारीही आपली आहे. 'अभी नही, तो कभी नही' हे लक्षात घेऊन स्वयंप्रेरणेनं आपण योग्य कृती करण्याची गरज आहे.
९. मागील निवडणुकीत भाजपाच्या बाजूनं फक्त ३५ टक्के मतं होती. उलट भाजपाविरोधी पक्षाकडे ६५ टक्के मतं आहेत. त्यातही यावेळी भाजपाची मतं मोठ्या प्रमाणात फुटणार आहेत. ती सारी मतं निश्चितपणे इंडिया आघाडिला किंवा भाजपा किंवा सहयोगी उमेदवाराच्या विरोधातील दुसर्‍या नंबरच्या उमेदवाराला खात्रीनं मिळणार आहेत. भाजपाविरोधी मते देखिल कधी नव्हे एवढी घट्टपणे एकत्र आलेली आहेत. बंगाल, पंजाब सारखे मोजके अपवाद वगळता देशात सर्वत्र एकास एक अशीच लढाई उभी राहिली आहे. मत विभाजनाची सुपारी घेतलेल्या काही नेत्यांचे कार्यकर्तेही यावेळी ऐकायला तयार नाहीत.
१०. या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून भाजपाच्या विरोधात देशात प्रचंड मोठी लाट आलेली आहे, हे वास्तव आहे. भाजपाची संपूर्ण देशात प्रचंड दाणादाण होणार आहे. 
११. मात्र मतमोजणी मधे गडबड करण्याची त्यांची तयारी जोरात सुरू आहे. ते शांत बसणार नाहीत. म्हणूनच कोणत्याही विकाऊ कर्मचाऱ्याची/अधिकाऱ्याची तशी हिंमत होणार नाही, यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी भाजपाविरोधी उमेदवारांच्या काउंटींग एजंटला हिम्मत द्या. मत मोजणीच्या वेळी काउंटींग सेंटर समोर मोठ्या संखेने उपस्थित रहा. मित्रांना पण सांगा. कायदा व सुव्यवस्था पाळा. वादविवाद टाळा. 
१२. मतमोजणीच्या वेळी बाहेर हजर असलेले लोक, जमा झालेली गर्दी, त्यांचा उत्साह यांचे फोटो, व्हिडीओ, पोस्ट सोशल मीडियावर सतत व्हायरल करत रहा. तिथे हजर नसलेल्या मित्रांना तुमचे व्हिडीओ, पोस्ट व्हायरल करायला सांगा.
१३. आतापासून ते निकाल लागेपर्यंत आणि नवे सरकार सुरळीतपणे अस्तित्वात येई पर्यन्त अशा पोस्ट व्हायरल करत रहा. याच विषयावर मित्रांशी बोलत रहा. भाजपामधले सर्वच लोक लोकशाही विरोधी/देशद्रोही आहेत, असं नव्हे. त्यातल्या चांगल्या लोकांना आपले व्हिडीओ पाठवा. आवर्जून त्यांना फोन करा. 'यावेळी तरी देशाचा विचार करा, देशाशी धोका करू नका' असं त्यांना प्रेमानं पण ठासून सांगा. पुन्हा पुन्हा सांगा. 
१४. काही मित्रांना घेऊन चौकात, गार्डनमधे एकत्र या. चर्चा करा. सोबत तिरंगा असू द्या. शक्य असेल तिथे गृपचर्चा घडवून आणा.
१५. सद्यातरी कोणत्याही सार्वजनिक, कौटुंबिक कार्यक्रमात, लग्न समारंभात याच विषयावर चर्चा करा. 
१६. लोकशाहीवादी संघटना, पक्ष तसेच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते जमेल तसे एकत्र या. संख्या महत्वाची नाही. ५/१०/१५ कितीही असो.. जमतील तेवढे लोक एकत्र या. कोणत्याही पक्षाचा झेंडा सोबत न घेता फक्त तिरंगा सोबत घ्या. पैदल मार्च काढा, सायकल मार्च काढा किंवा बाईक मार्च काढा. हे करताना कायदा हातात घेऊ नका. पण मुकाटही बसू नका. 'जनतंत्र बचाओ, देश बचाओ' अशा सारख्या घोषणा द्या. कुणाच्याही विरोधात घोषणा देऊ नका. हे सारे फोटो, व्हिडीओ व्हायरल करा. 
१७. 'गुड मॉर्निग' 'गुड ईव्हीनिंग' ऐवजी 'लोकशाही वाचवा'' 'मतमोजणीतील घोटाळे सहन करणार नाही' 'मतमोजणी इमानदारीने झाली पाहिजे' असे मेसेज सर्वांना पाठवा.
१८. थोडक्यात, तुम्ही जागरूक आहात, संघटित आहात, एकत्र आहात असं चित्र दिसू द्या. तशा अर्थाचे मेसेज तुमच्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पाठवा. इतर पक्षाच्या लोकांनाही पाठवा. पत्रकारांना, कर्मचाऱ्यांना, विचारवंत वगैरेसह सर्वानाच पाठवा. भाजपाच्या लोकांना देखिल पाठवा. आठवणीने पाठवा. 
१९. विशेष म्हणजे.. इतरांना दोष देत बसू नका. स्वत: कृती करा. इतरांनाही कृती करायला सांगा! 

धन्यवाद! 
-
ज्ञानेश वाकुडकर 
अध्यक्ष 
लोकजागर अभियान 
-
संपर्क
मनिष नांदे
सचिव, लोकजागर अभियान 
8605166191
रविंद्र रोकडे
सोशल मिडिया प्रभारी,
लोकजागर अभियान 70215 15575

Post a Comment

0 Comments