नागरिकांचे हाल! उकाड्याने नागरिक हैराण
जुनगाव: आज दुपारी साडेतीन ते चार च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्याने बोंडेला खुर्द येथील विजेचे खांब वाकले असल्याने व तारा तुटल्याने वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला आहे. बोंडेडा बुद्रुक, देवाडा बुजरूक, आणि जुनगाव या तिन्ही गावाची लाईन गायब झाली आहे.
आज रात्रभर लाईट येणार नसल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत.
नवीन पोल आणून लावल्याशिवाय वीज पुरवठा सुरळीत होणे शक्य नाही आणि ते काम उद्या शिवाय होणार नाही असे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
0 Comments