Ticker

6/recent/ticker-posts

*महिलांना तात्काळ उत्पन्न प्रमाणपत्र द्या : यंग चांदा ब्रिगेडची मागणी,* *तहसीलदार यांना निवेदन*

*महिलांना तात्काळ उत्पन्न प्रमाणपत्र द्या : यंग चांदा ब्रिगेडची मागणी,*


*तहसीलदार यांना निवेदन*
राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत उत्पन्नाच्या दाखल्याची अट घालण्यात आली आहे. मात्र, उत्पन्नाचा दाखला उपलब्ध होण्याचा कालावधी अधिक असल्याने महिलांना अडचणी होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना तात्काळ उत्पन्न प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
        सदर मागणीचे निवेदन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार विजय पवार यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, सायली येरणे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, विमल कातकर, हरमन जोसेफ, बबलू मेश्राम, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती.
      राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आता अंमलात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातील. या योजनेचा लाभ 21 ते 60 वयोगटातील महिलांना मिळणार आहे.
      परंतु, या योजनेसाठी महिलांना उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. शहर आणि ग्रामीण भागातील अनेक महिला उत्पन्न प्रमाणपत्रासाठी अर्ज करत आहेत. परंतु, उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी १५ दिवसांचा असल्याने त्यांना अडचणी येत आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 जुलै असल्याने प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे.
        या समस्येच्या पार्श्वभूमीवर, सरकारने उत्पन्न प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी, अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments