मानसिक नैराश्यातून होमगार्डची गळफास घेऊन आत्महत्या
- चेक बल्लारपूर येथील घटना
दरारा 24 तास
पोंभूर्णा:- तालुक्यातील चेक बल्लारपूर येथील होमगार्डने मानसिक नैराश्यातून आपल्याच घरी आड्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि.१ जुलैला सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडकीस आली.विक्की रामदास कोमलवार (वय २९) रा.चेक बल्लारपूर, ता.पोंभूर्णा असे मृतकाचे नाव आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूर येथील होमगार्ड विक्की कोमलवार याला दारूचे व्यसन होते.तो अनेक दिवसांपासून मानसिक नैराश्येत होता.दोन दिवसांपुर्वी पत्नी व मुलगी हे एका कार्यक्रमा निमित्त बाहेर गावी गेले होते.सोमवारला सकाळी ८ वाजताच्या दरम्यान मृतकाने घरात कोणी नसल्याचे पाहून घरातील आड्याला गळफास घेऊन त्यानी आत्महत्या केली.याबाबत पोंभूर्णा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मर्ग दाखल केले.व मृतदेह पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संतोष येनगंदेवार करीत आहेत. मृतक विक्की कोमलवार यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,म्हातारे आईवडील असा परिवार आहे.
0 Comments