Ticker

6/recent/ticker-posts

पिण्याच्या पाण्यासाठी पोंभूर्णा पंचायत समितीवर घागर फोड आंदोलन"*

    
💥 *"पिण्याच्या पाण्यासाठी पोंभूर्णा पंचायत समितीवर घागर फोड आंदोलन"*


पोंभूर्णा तालुक्यातील पंधरा गावांसाठी असलेली वेळवा येथील ग्रीड पाणीपुरवठा योजना वीजबिल भरणा न केल्यामुळे मागील दीड महिन्यापासून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील पंधरा गावातील नागरिकांना सतत दुषीत पाणी प्यावे लागत आहे. वारंवार सूचना करूनही संबंधीत विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याऐवजी संबंधित विभागाने हात वर केले आहे. पंधरा गावातील नागरिकांना होणारा त्रास बघता *दि. १ ऑगस्ट 2024 ला रोज गुरूवार सकाळी 11 वाजता पोंभूर्णा पंचायत समिती समोर*"घागर फोड आंदोलन" चे आयोजन करण्यात आले आहे.
तरी, ग्रीड योजनेतील तसेच गंगापूर आणि टोक येथील सर्व लाभार्थी/ नागरिक जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे ग्रामपंचायत सदस्य इंजिनीयर वैभव पिंपळशेंडे यांनी केले आहे.
*आंदोलनाचे मुद्दे आणि मागण्या...*

1. ग्रीड पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करावी.
2. मोदी घरकुल योजनेचा दुसरा आणि तिसरा हफ्ता लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावा.
3. गंगापूर आणि टोक येथे जल शुध्दीकरण यंत्र तात्काळ बसविण्यात यावे.
4. अनेक महिन्यांपासून थकीत असलेले निरधांचे पैसे त्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावे.
5. मागील वर्षी अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे अनुदान तात्काळ देण्यात यावे.
6. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावे.
7. ज्या ओबीसी नागरिकांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेच्या "ड" यादीमध्ये नाही तसेच सिस्टम ने अपात्र केलेल्या त्या गरजू नागरिकांना मोदी घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावा.

जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही किंव्हा लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.🙏🏻

Post a Comment

0 Comments