*पाणीप्रश्नावरून पोंभूर्णा येथील गट विकास अधिकाऱ्याच्या अंगावर फेकले गढुळ पाणी*
*" तुम्ही पिता RO चे पाणी ' जनता पिणार गढूळ पाणी - संदिप गिऱ्हे*
*-संतापलेल्या नागरिकांसह शिवसैनिकांचा ताबा सुटला*
*-पोंभूर्णा पंचायत समितीवर घागर फोड आंदोलन*
*-आंदोलकांवर गुन्हे दाखल*
पोंभूर्णा :-पोंभूर्णा तालुक्यातील १५ गावांना पाणीपुरवठा करणारी वेळवा येथील ग्रीड पाणीपुरवठा योजना मागील दीड महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांवर दुषीत पाणी पिण्याची वेळ आली असल्याने संतापलेल्या नागरिकांना घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वात नागरिक व असंख्य शिवसैनिक पोंभूर्णा पंचायत समिती येथे दाखल होत गटविकास अधिकाऱ्याच्या दालनासमोर आधी घागर फोडण्यात आले व नंतर गट विकास अधिकाऱ्याशी चर्चा करीत असताना अधिकाऱ्याकडून उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी गट विकास अधिकाऱ्याच्या अंगावर गढुळ पाणी फेकण्यात आले. हे पाणी अंघोळ करू शकत नाही तर जनता असे पाणी पिऊन राहिली आहे.
साधारण ३० कोटी रूपये खर्च करून १५ गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळेल यासाठी ग्रीड योजना सुरू करण्यात आली. मात्र मागील दीड महिन्यापासून वीजेचा बिल भरणा न केल्यामुळे सदर योजना बंद पडली आहे.याचाच परिणाम म्हणून ग्रीड योजनेतील १५ गावच्या लाभार्थ्यांना पावसाळ्यातही गढुळ व दुषीत पाणी प्यावे लागत आहे.याबाबत पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडे समस्यांंचे अनेक निवेदने देण्यात आले होते.मात्र प्रत्येकवेळी संबंधित विभागाने एकमेकांवर बाजू ढकलून देण्याचेच काम केले होते.परिणामी नागरिकांना योजना बंद असल्याने गढुळ व दुषीत पाणी पिल्याशिवाय दुसरा मार्ग उरला नव्हता.यामुळे संंतापलेल्या नागरिकांनी सदर ग्रीडची पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली दि.१ ऑगस्ट रोज गुरुवारला पंचायत समिती समोर घागर फोड आंदोलनाचे आयोजन केले. यावेळी यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार, सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळशेंडे,शहर प्रमुख गणेश वासलवार,महेश श्रिगीरिवार,वेळवा सरपंच जितेंद्र मानकर,घनोटी सरपंच पवन गेडाम, आष्टा सरपंच किरण डाखरे, थेरगाव उपसरपंच वेदनाथ तोरे,रवींद्र ठेंगणे,महिला जिल्हा संघटिका कल्पना गोरघाटे, नगरसेविका रामेश्वरी वासलवार, बालाजी मेश्राम, सुनीता वाकुडकर , सुरेखा कुडमेथे, मंगलदास लाकडे,गोकुळ तोडासे,किशोर वाकूडकर,व आदी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
---------
शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल....
*बल्लारपूर विधानसभेत न्याय मागाल तर गुन्हे दाखल होणार...*
पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा येथील 15 गावांची ग्रिड पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात यावे या साधारण व जन कल्याणाची मागणी करण्याकरिता गटविकास अधिकारी यांच्या कडे समस्या सोडवण्यासाठी गेले असता जाब विचारले म्हणून सर्वसामान्य जनतेचे तोड बंद करण्याकरिता गटविकास अधिकारी यांच्या कडून आंदोलकांवर गुन्हे दाखल. करण्यात आले. यावरून बल्लारपूर विधानसभेत लोकशाही नाही तर हुकूमशाही असल्याची प्रचिती आली आहे.
---------------------
*विकास पूरुष्यांच्या विधानसभेत नागरिकांना प्यावे लागते दुषित पाणी.*
*‘’तुम्ही पिता RO चे पाणी, जनता पिणार गढुळ पाणी.!!’’ - संदिप गिऱ्हे*
सत्ताधारी म्हणवून घेणाऱ्यांनी आर.ओ.चे पाणी प्यायचे आणि गाव खेड्यातील लोकांनी गढुळ पाणी प्यायचे,त्यांचे मुलं बाळं रोगराईने मरायचे.असा आहे का तुमचा विकास.विकास पूरुष म्हणून मिरवणारे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एखाद्य्या इव्हेंट वर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा एखाद्या इव्हेंटवर खर्च होणारा निधी जर आपल्याच विधानसभेतील गावखेड्यातील पाणी प्रश्नावर जर केले असते तर गावखेड्यातील नागरिकांना ढोरं पितात तशी पाणी पिण्याची वेळ आली नसती.विकास पूरुष्यांच्या विधानसभेत नागरिकांना जर गढुळ व दुषित पाणी प्यावे लागत असेल तर हे दुर्भाग्य पुर्ण गोष्ट आहे.असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी यावेळी उपस्थित केला.
0 Comments