Ticker

6/recent/ticker-posts

पोंभुर्णा-मुल मार्गावर मोठमोठे खड्डे; मोठया अपघातास आमंत्रंण! सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देण्याची गरज -सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर

पोंभुर्णा-मुल मार्गावर मोठमोठे खड्डे; मोठया अपघातास आमंत्रंण!



सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देण्याची गरज

-सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर 


दरारा 24 तास न्युज नेटवर्क पोंभुर्णा:प्रतिनिधी | पोंभुर्णा ते मुल मार्गावरील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या देवाडा खुर्द येथील आंबेडकर चौकात रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासुन मध्यभागी अपघातास आमंत्रण देणारे व वाहनधारकाचे जिवघेणारे मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. या विषयाकडे पोंभुर्णा मुल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देवुन हे खड्डे दुरूस्त करावे अशी मागणी जाम तुकोमचे सरपंच व तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांच्यासह नागरिक व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

https://youtu.be/IAM__keEi-w?si=MtPlAi0Y4hIDPzmI

पोंभुर्णा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पोंभुर्णा ते मुल या वर्दळीच्या मार्गावरील रस्त्यावर आंबेडकर चौकातील एका ट्रेडर्स समोर व बस स्थानक जवळ धोकादायक व जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत.सद्या पावसाळयात या खुड्यांमध्ये पाऊसाचे पाणी साचले की वाहनधारकांना या खड्याचा अंदाज घेता येत नसल्याने मोठा अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता असून या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन खड्डे दुरुस्त करावे अशी मागणी बोधलकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments