Ticker

6/recent/ticker-posts

वाढदिवस एका लढवय्या सामाजिक कार्यकर्त्याचा

वाढदिवस एका लढवय्या सामाजिक कार्यकर्त्याचा


आज 6 जुलै रोजी जुनगावचे सरपंच, भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा चे तालुका उपाध्यक्ष, आपल्या अंगभूत हुशारी, कौशल्य, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर सामाजिक उपक्रमासोबत राजकीय व बांधकाम व्यवसायातही यशस्वी होतो. आणि तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या अनेक भागात आपली ओळख निर्माण करतो असा एक उमदा तरुण राहुल पाल यांचा आज वाढदिवस...


हा युवक आपण समाजाचे काही देणे लागतो असे समजून सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून प्रचंड काम उभे करतो. प्रत्येक दिवशी नवं क्षितीज शोधणारे अफाट उत्साही व्यक्तिमत्व श्री राहुल भाऊ पाल यांचा 6 जुलै रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्त .......


सर्वसामान्य कुटूंबात जन्मल्यानंतर स्वतःच्या व कुटूंबाच्या गरजा भागविण्यासाठी पडेल ते कष्ट उपसताना विविध प्रकारचे लहान मोठे व्यवसाय करत आपल्या अंगभूत हुशारी, कौशल्य, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर सामाजिक उपक्रमासोबत शैक्षणिक व बांधकाम व्यवसायातही यशस्वी होवून सारी क्षितीजे पार करून नावलौकीक प्राप्त करत कायम समाजासाठी झटत असणाऱ्या नेतृत्वाला प्रणाम करावासा वाटतो.


म्हणूनच या कुशल नेतृत्वाला गावात व परिसरातील सर्व वयोगटातील नागरिक राहुल भाऊ पाल यांचेकडे आशेने पाहत आहेत. आज पर्यंत केलेली समाजसेवा हे आपले कर्तव्य आहे. परमेश्वर सर्व कार्य आपल्याकडून करून घेत असतो आपण मात्र निमित्तमात्र असतो. परमेश्वराने मला जे काही देत आहे त्यामागे त्याची काही योजना असावी त्यामुळेच माझे तन, मन आणि धन मी माझ्या समाजासाठी वापर करत असतो असे ते यानिमित्ताने बोलले..  त्यांच्या कार्याला आणि कर्तुत्वाला सलाम त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा ...दीर्घायुष्य लाभावे आणि निरोगी रहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏


जीवनदास गेडाम, माजी सरपंच जुनगाव, शिवसेना उपतालुका प्रमुख, दैनिक चंद्रपूर समाचार विशेष प्रतिनिधी, दरारा 24 तास न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक



Post a Comment

0 Comments