Ticker

6/recent/ticker-posts

व्यावसायीक ग्राहकांनी QR Code सुविधेचा लाभ घ्यावा -जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे आवाहन

व्यावसायीक ग्राहकांनी QR Code सुविधेचा लाभ घ्यावा -जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे आवाहन

दरारा 24 तास न्युज नेटवर्क
चंद्रपूर:खात्यामध्ये QR Code द्वारे रक्कम स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यांत आलेली आहे. त्यामध्ये व्यावसायीक ग्राहकांनी दुकानाचे लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, खाते क्रमांक, व रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकसह आवश्यक फॉर्म भरून शाखेत अर्ज केल्यानंतर प्रमुख कार्यालयातुन क्यू आर कोड सुविधा उपलब्ध करून देण्यांत येईल.

यावर ग्ग्रहकांकडुन व्यावसायीकांचे खात्यात रक्कम जमा झाल्याबाबत एसएमएस येईल. व संपूर्ण दिवसात जमा झालेली रक्कम दुस-या दिवशी व्यावसायीक ग्राहकांचे खात्यात जमा होईल. तुर्तास याबाबत व्यावसायीकझ ग्राहकांकडुन कोणतेही शुल्क आकारण्यांत येणार नाही.

तरी बँकेच्या व्यावसायीक खातेदारांनी नजिकच्या शाखेत जावून आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा. प्रमुख कार्यालयातुन त्यांना लवकरात लवकर क्यू आर कोडउपलब्ध करून देण्यांत येईल. तरी व्यावसायीक खातेदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी केले आहे.

    खात्यामध्ये QR Code द्वारे रक्कम स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यांत आलेली आहे. त्यामध्ये व्यावसायीक ग्राहकांनी दुकानाचे लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, खाते क्रमांक, व रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकसह आवश्यक फॉर्म भरून शाखेत अर्ज केल्यानंतर प्रमुख कार्यालयातुन क्यू आर कोड सुविधा उपलब्ध करून देण्यांत येईल.

यावर ग्ग्रहकांकडुन व्यावसायीकांचे खात्यात रक्कम जमा झाल्याबाबत एसएमएस येईल. व संपूर्ण दिवसात जमा झालेली रक्कम दुस-या दिवशी व्यावसायीक ग्राहकांचे खात्यात जमा होईल. तुर्तास याबाबत व्यावसायीक ग्राहकांकडुन कोणतेही शुल्क आकारण्यांत येणार नाही.

तरी बँकेच्या व्यावसायीक खातेदारांनी नजिकच्या शाखेत जावून आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा. प्रमुख कार्यालयातुन त्यांना लवकरात लवकर क्यू आर कोडउपलब्ध करून देण्यांत येईल. तरी व्यावसायीक खातेदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments