भाजयोमोचे जिल्हा सचिव वैभव पिंपळशेंडे भाजपातून निष्काषीत!
पोभुर्णा: वारंवार पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणावरून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव व चेक ठाणे वासना ग्रामपंचायतचे सदस्य इंजिनियर वैभव पिंपळशेंडे यांना जिल्हा सचिव पदावरून व पक्षातून निष्काशीत करण्यात आल्याचे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष बळीरामजी देवकाते यांनी प्रसारित केले आहे. शिवसेनेतर्फे नुकत्याच झालेल्या पंचायत समिती वर घागर फोड आंदोलनात वैभव पिंपळशेंडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्यामुळेच त्यांना निष्काशीत करण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.
===================
चांगल्या कामाचे फळ-इंजिनीयर वैभव पिंपळशेंडे
===================
जनतेच्या समस्यांना घेऊन वाचा फोडणे, गोरगरिबांवर होणारे अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी पुढाकार घेऊन आंदोलन करणे, घरकुलाच्या निधीसाठी पुढाकार घेणे, निस्वार्थपणे काम करत लोकांच्या मनात घर करणे हेच तालुक्यातील तालुक्यातील तथाकथित भाजप नेत्यांना नको आहे. त्यांची हुजरेगिरी करणारा, होला हो लावणारा, आत्मसन्मानासाठी न लढणारा कार्यकर्ता हवा आहे. मी माझ्या वैयक्तिक सामाजिक कार्यातून अनेक लोकांच्या अडीअडचणींना वाचा फोडली आहे. त्यामुळे काही लोकांची जळ फळाट होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील अनेक गावे तहानलेली असताना त्यांची तहान भागवण्यासाठी पुढाकार घेणे मला महागात पडले. मात्र माझे कार्य हे सतत चालू राहील-
इंजी.वैभव पिंपळशेंडे, ग्रामपंचायत सदस्य ठाणेवासना,ता. पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर
0 Comments