*⭕▪️-उपसरपंच हेमंत आरेकर यांची मागणी। कर्मचाऱ्यांअभावी केंद्राची दुर्दशा*
*🟣पावसाळा दिवसात रोगराई पसरण्याची शक्यता वजा भीती*
व्हिडिओ पहा 👇👇👇
https://youtu.be/lHZoBqCgSRY
पोंभुर्णा: दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
तालुक्यातील सात गावांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी देवडा भुज येथे लाखो रुपये खर्च करून शासनाने प्राथमिक स्वास्थ उपकेंद्राची भव्य इमारत उभारली. मात्र आज घडीला ही इमारत निव्वळ शोभेची वस्तू ठरली आहे. या भल्या मोठ्या इमारतीत कायमस्वरूपी राहणारे कोणीही कर्मचारी नसल्याने सध्या स्थितीत कुलूप बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या इमारतीची दुर्दशा झाली आहे. या इमारतीची डागडुजी व दुरुस्ती करून सुसज्ज करावी.
सुरुवातीला परिचारिकेची उपस्थिती रहात होती. आणि त्या कायमस्वरूपी राहत होत्या. आणि नागरिकांना सुविधा मिळत होत्या. परंतु या आधीच्या परिचारिकांची बदली झाल्यामुळे ही इमारत आता पोरकी झाली असून ओस पडली आहे. इमारती बरोबरच नागरिकांची आरोग्याची हमी घेणारे आरोग्य विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी व उपसरपंच हेमंत आरेकर यांनी केला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्दी, खोकला,ताप, मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू इत्यादी आजार लवकरच उद्भवतात ही वस्तुस्थिती दरवर्षीचीच आहे. यासाठी या विविध आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असते. आरोग्य विभागाने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष केंद्रित करून येथे कायमस्वरूपी, रहिवासी परिचारिका व इतर कर्मचारी देण्यात यावे आम्ही सीएचओ ची जागा सुद्धा भरण्यात आली असून त्या सुद्धा येथे येण्यास टाळाटाळ करीत आहे.सद्यस्थितीत तरी त्यांनी येथे उपस्थित व्हावे अशी मागणी उपसरपंच व काँग्रेस चे तालुका युवा अध्यक्ष हेमंत आरेकर यांनी केली आहे.
0 Comments