Ticker

6/recent/ticker-posts

नेहरु विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय चिमूर येथे शिक्षक व पालक सभा संपन्न

नेहरु विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय चिमूर येथे शिक्षक व पालक सभा संपन्न



✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
         7887325430

चिमुर:आज दिनांक ०३/०८/२०२४ रोज शनिवारला नेहरु विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय चिमूर येथे सन २०२४-२५ ची पालक व शिक्षक सभा व माता पालक सभा आज दुपारी १२.०० वाजता कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली, यावेळी सभेचे विषय पालक शिक्षक संघाच्या कार्यकारणीची निवड करणे, पालक शिक्षक संघ स्थापन करण्याच्या उद्देश स्पष्ट करणे, शाळेतील विविध उपक्रमाची माहिती देणे, शिष्यवृत्ती सारख्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे, पालकांच्या सूचनांचे संकलन करणे, अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषयावर चर्चा करण्यात आली.


पालक शिक्षक संघाच्या कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष गणेश गावंडे, सचिव गाडवे सर,सहसचिव पदी सौ. आरती स्वान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरकर सर यांनी केले आभार प्रदर्शन श्रीराम सर यांनी केले असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष-निशिकांत मेहरकुरे, ने.वि.प्राचार्य, अतिथी - मिलमिले सर पर्यवेक्षक, श्रीमती उमरे मॅडम पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक, शिक्षीका व पालक वर्ग यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments