Ticker

6/recent/ticker-posts

पत्नीपाठोपाठ पतीचीही विहिरीत उडी दोघांचाही दुर्दैवाने मृत्यू

पत्नीपाठोपाठ पतीचीही विहिरीत उडी दोघांचाही दुर्दैवाने मृत्यू



चंद्रपूर: जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून त्यात पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे. पत्नीने अज्ञात कारणावरून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. पत्नीला वाचवण्यासाठी पतीने तत्काळ विहिरीत उडी घेतली, मात्र दुर्दैवाने दोघांचाही या घटनेत मृत्यू झाला.
प्रकाश ठेंगणे आणि उषा प्रकाश ठेंगणे अशी मृतांची नावे आहेत. प्रकाश आणि उषाचा आंतरजातीय विवाह तीन महिन्यांपूर्वीच झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, मात्र आत्महत्येमागील नेमकी कारणे आणि या भीषण अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Post a Comment

0 Comments