सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांच्या मागणीची दखल
पोंभुर्णा ते मूल मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
चंद्रपूर समाचार मीडिया वृत्ताची दखल
पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी
पोंभुर्णा ते मूल मार्गावरील देवाडा खुर्द येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात व या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे मोठमोठ्या वाहनांची व छोट्या वाहनधारकांची अपघात होण्याची दाट शक्यता होती.
ही समस्या लक्षात घेऊन सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष व जामतुकूम ग्रामपंचायतचे माजी सरपंच भालचंद्र बोधलकर यांनी सदर खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला जागृत करण्याचे काम केले.
त्यांनी मीडियाच्या माध्यमातून सदर धोका प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. त्यांच्या या मागणीची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन सदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याने प्रवाशांनी व नागरिकांनी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागालाही उशिरा का होईना जाग आल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले आहे.
======================
0 Comments