दरारा 24 तास न्युज नेटवर्क
मुंबई: महाराष्ट्र भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे राज्यसभा खासदार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे व माजी खासदार भास्करराव पाटील, त्यांच्या बहिण डॉ. मीनल पाटील खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, 'भास्करराव कोणत्याही पदाच्या लालसेशिवाय काँग्रेसमध्ये आले आहेत. अशा तळागाळातील कार्यकर्त्यांचे आमच्या पक्षात स्वागत आहे.
0 Comments