Ticker

6/recent/ticker-posts

निर्धार एकजुटीचा, निर्धार विजयाचा - बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात संतोष सिंह रावत यांची बल्ले बल्ले - प्रत्येक गावात संतोष सिंह रावत यांच्याच नावाला पसंती - काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह-विधानसभा जिंकूच हा निर्धार

निर्धार एकजुटीचा, निर्धार विजयाचा -

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात संतोष सिंह रावत यांची बल्ले बल्ले


- प्रत्येक गावात संतोष सिंह रावत यांच्याच नावाला पसंती 

- काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह-विधानसभा जिंकूच हा निर्धार 

पोंभुर्णा: बल्लारपूर विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत होणार अशी शक्यता व चित्र आतापासूनच दिसू लागले आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. उद्या परवा निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्र दौऱ्यावर असून निवडणुकीची तारीखही लवकरच निश्चित होईल अशी आशा आहे. अशातच बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने संतोष सिंह रावत यांना पुढे करून मतदार संघ पिंजून काढण्याचा चंग बांधलेला आहे. त्यानुसार काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्येक गावात जाऊन बैठका घेत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या, मजुरांच्या समस्या, बेरोजगारांच्या समस्या जाणून घेत आहेत.त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास लाभला आहे. महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला लाभला आहे. छत्रपती शिवाजी राजांनी बलाढ्य शक्तींशी लढून स्वराज्य निर्माण केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने इंग्रज साम्राज्य भारतातून हद्दपार झाले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. स्वराज्य, स्वातंत्र्य आणि संविधान या संकल्पनेला, विचाराला भाजप सरकार धक्के देण्याचे काम करीत आहे. त्यामुळे या निवडणुकीत सरकारला जागा दाखवण्याची गरज आहे. 

लोकहिताची कामे करणे, सर्वांगीण विकास साधने हा काँग्रेस पक्षाचा मूलमंत्र आहे. एकमेकात द्वेष भावनेने वागून भांडणे लावणाऱ्या भाजपला आपण सत्तेपासून दूर लोटले पाहिजे. असा संदेश कार्यकर्ते नेते गावोगावी घरोघरी फिरून देत आहेत. त्यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारण येथे नेतृत्व करणारे नामदार सुधीर मुनगंटीवार हे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे काँग्रेसला सहज शक्य होईल असे वातावरण नसले तरी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व जनमानसांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments