मुल: तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिसंवर्धनशील असलेल्या व मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदगाव येथे रविवारी दिनांक 9 सप्टेंबर च्या मध्यरात्री नांदगाव येथील नऊ दुकानांना चोरट्यांनी लक्ष केले. दुकानांचे शटर वाकवून गावातील बस स्थानक परिसरात वेगवेगळ्या भागात असलेल्या नऊ दुकानांमध्ये चोरी करण्यात आली. यात एका बार अँड रेस्टॉरंट चा समावेश असून सर्व ठिकाणचा चोरीस गेलेला एकूण मुद्देमाल जवळपास लाखाच्या घरात आहे.
दीड ते अडीच वाजताच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. काही दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोर येताना आणि चोरी करताना दिसत आहेत. यावरून हे सर्व कृत्य एकाच टोळीचे असावे असा अंदाज व्यक्त होत आहे. नांदगाव पासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर पोलीस चौकी असताना वारंवार असे प्रकार घडतात.त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
0 Comments