महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि 21:- राष्ट्रसंताचे विचार च भारत देशाला सुजलाम सुफलाम बनवू शकतात तसेच वीर बाबुराव शेडमाके यांचा पराक्रम उजूनही प्रेरणा देणारा असून त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी असे प्रतिपादन करुन
स्थानीक गवराळा वॉर्ड येथील जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ तर्फे राष्ट्र संत तुकडोजी महाराज व वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके स्मृतिदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे जेष्ठ सदस्य नीलकंठ आत्राम, ज्ञानेश्वर परचाके श्यामराव खापने, उद्धव निळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव डोगें, बाबाराव नीखाडे, राजू माडेकर, विनोद सावनकर, गणेश ढोके, रमेश परचाके, विलास खापने यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिमेश माणूसमारे तर आभारप्रदर्शन पांडूरंग कोयचाडे यांनी केले. खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments