Ticker

6/recent/ticker-posts

वरोरा-भद्रावती विधानसभा तिकीटासाठी शिवसैनिकांची जोरदार मागणी, मुकेश जीवतोडेंच्या उमेदवारीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आवाहन

वरोरा-भद्रावती विधानसभा तिकीटासाठी शिवसैनिकांची जोरदार मागणी, मुकेश जीवतोडेंच्या उमेदवारीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आवाहन

महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती 

भद्रावती दि.21:' महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या (काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत 75 वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला यावा, अशी जोरदार मागणी उचलली जात आहे.


आज शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आवाहन करत मुकेश जीवतोडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत, "75 वरोरा-भद्रावती शिवसेनेच्या वाट्याला आलीच पाहिजे!" आणि "मुकेश जीवतोडेंना तिकीट मिळालेच पाहिजे!" अशा आवाजात आपली मागणी व्यक्त केली.

शिवसैनिकांचे म्हणणे आहे की, मुकेश जीवतोडे यांनी वरोरा-भद्रावती मतदारसंघात शिवसेनेचे संघटन मजबूत केले आहे आणि त्यांच्या नेतृत्वात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. युवकांना रोजगार मिळवून देणे, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणे या त्यांच्या कार्यामुळे मतदारसंघात त्यांची लोकप्रियता वाढली आहे.

शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे की, आगामी निवडणुकीत 75 वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातून मुकेश जीवतोडे यांना उमेदवारी देण्यात यावी, कारण त्यांची उमेदवारी निवडणुकीत विजय निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरेल.

Post a Comment

0 Comments