बल्लारपूर विधानसभेत संतोष सिंह रावत यांचा जलवा
मुल: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बल्लारपूर विधानसभेत भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
भारतीय जनता पक्षाने राज्याचे वजनदार मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवर यांना उमेदवारी दिली आहे.आणी ते प्रचारात आघाडी घेऊन आहेत. मात्र काँग्रेस पक्षाने ऐन वेळेवर उमेदवारी वाटपाचा तिढा सोडवला. आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांना उमेदवारी जाहीर केली.
त्यांनी काल शक्ती प्रदर्शन करत मुलं येथील उपविभागीय कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावरून अर्ज दाखल केला. यावेळी संपूर्ण मूल शहर काँग्रेसमय झालेले दिसले. प्रचंड प्रमाणात आलेल्या महिला व पुरुष कार्यकर्ते जोशाने रॅलीत सहभागी झालेले दिसले.
मूलमध्येच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात संतोष सिंह रावत यांच्या कालचा रॅलीची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी सुद्धा त्यांना समर्थन व सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
0 Comments