Ticker

6/recent/ticker-posts

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी संतोष सिंह रावत यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा - शिक्षणाची मंदिरे बंद करणाऱ्या भाजपला हद्दपार करा-नितेश कराडे यांचा भाजपवर निशाणा

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी संतोष सिंह रावत यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा


शिक्षणाची मंदिरे बंद करणाऱ्या भाजपला हद्दपार करा-नितेश कराडे यांचा भाजपवर निशाणा


सिंचन सुविधा नसल्याने शेतकरी हवालदिल

दरारा 24 तास न्युज नेटवर्क 

पोंभुर्णा : शिक्षणाचे मंदिरे महात्मा फुले यांनी उभी केली मात्र महायुती सरकार राज्यातील शाळा बंद करत असून बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील याची तळजोड करत आहे.


राज्यातील उद्योग गुजरातला पळवुन नेण्यास केंद्र सरकारला सहकार्य करणाऱ्या महायुतीच्या राज्य सरकारने युवकांना बेरोजगार केले असुन बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील तीन आदीवासी निवासी आश्रमशाळा बंद करून आदीवासी समाजातील मूला-मूलींना शिक्षणापासुन वंचित ठेवण्याचे काम केले आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे यांनी केला आहे. 
     
 
ते बल्लारपुर विधानसभा क्षेञातील महाविकास आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या निवडणुक प्रचारार्थ पोंभुर्णा येथील आयोजित सभेत बोलत होते.
     
ते पुढे म्हणाले,३३ कोटी वृक्ष लागवडीच्या योजनेत कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचे सांगतांना नितेश कराळे यांनी ज्या योजनेत पैसे खाता येते तश्याच योजना सध्याची सरकार राबवित असुन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास घरोघरी प्रिपेड विद्युत मिटर लावुन जनतेची लुबाळणुक करणार असल्याचे सांगीतले. 


क्षेत्राचे आमदार राज्याचे मंञी असताना क्षेत्रात वाहणाऱ्या उमा आणि अंधारी नदीवर बंधारे बांधुन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देवु शकले असते परंतु तसे न करता शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीपासुन वंचित ठेवण्याचे काम केले. नितेश कराळे यांनी शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ शेतकरी कल्याण योजना राबवीतांना दुसरीकडे माञ शासनाने खत आणि किटकनाशकांवर जीएसटी लादुन अन्याय केल्याचा आरोप केला. काही दिवसांपुर्वी पोंभुर्णा येथे राज्याचे राज्यपाल येवुन गेले. आदीवासी बांधवांच्या कल्याणासाठी पेसा कायदा लागु करतील अशी परीसरातील आदीवासी समाजाची अपेक्षा होती. परंतु केंद्र शासनाच्या नियंञणात काम करणाऱ्या राज्यपालांनी आदिवासी समाजाची घोर निराशा केली. हे आदीवासी समाज कधीही विसरणार नाही. असेही नितेश कराळे म्हणाले.
    
अभी नही तो कभी नही म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष रावत तोडीस तोड देणारे उमेदवार असुन त्यांचा राजकीय व सामाजिक कार्याचा प्रवास लक्षात घेवुन मतदारांनी क्षेञातील उमेदवाराला मतदान करावे. असे आवाहन केले. यावेळी उमेदवार संतोषसिंह रावत यांनी या तालुक्यात सिंचन सुविधा नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 


आजपर्यंत केलेले सामाजिक कार्ये आपल्याकडून अविरत घडत राहावे अशी अपेक्षा बाळगत मतदारांनी मतरूपी आशिर्वाद द्यावे. अशी विनंती केली.
     
जिल्हा काँग्रेसचे सचिव ओमेश्वर पदमगिरीवार यांनी सभेचे प्रास्ताविक केले. 

सभेचे संचालन प्रशांत झाडे तर धम्मा निमगडे यांनी आभार मानले. सभेला पवन भगत, विजय चिमड्यालवार, चिञा डांगे, वैशाली बुरांडे, अशोक गेडाम, गुरूदास गुरनुले, वासुदेव पाल, नरेश बुरांडे, अमोल पाल, सुधाकर ठाकरे, दिव रणदिवे, वैभव पिंपळशेंडे, हेमंत आरेकर, पराग मुलकलवार, विनोद थेरे, प्रिया सातरे, अँड. अनुज गेडाम, सुधाकर काकडे, श्रीहरी पावडे आदींसह हजारो नागरीक उपस्थित होते.

*प्रचार सभे दरम्यान जनस्वराज संघटना चंद्रपूर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांना पाठींबा जाहीर केला.*

Post a Comment

0 Comments