Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूर जिल्हा बँकेत लिपीक, शिपाई पदांसाठी भरती!

 चंद्रपूर जिल्हा बँकेत लिपीक, शिपाई पदांसाठी भरती!



दरारा 24 तास न्युज नेटवर्क 


चंद्रपूर: नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी महत्त्वाची  बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Chandrapur District Central Cooperative Bank)  यथे लिपीक व शिपाई पदांच्या (Clerk and Peon Recruitment) एकूण ३५८ पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी ८ ऑक्टोबरपासून बँकेचे अधिकृत संकेतस्थळ  http://cdccbank.co.in/ वर जाऊन अर्ज करू शकतात. 


अर्ज करण्याची अंतिम मुदत १९ ऑक्टोबर (Deadline October 19) देण्यात आली आहे. 


चंद्रपूर जिल्हा बँकेतील एकुण ३५८ रिक्त जागांपैकी लिपीक पदाच्या २६१ तर शिपाई पदाच्या ९७ जागांसाठी ही भरती राबवण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी उमेदवारांचे वय हे १८ ते ४५ वर्षाच्या मध्ये असणे आवश्यक आहे. लिपीक पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेचा पदवीधर व MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर शिपाई पदांसाठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 


अर्जाची लिंक ८ ऑक्टोबर सकाळी ११ ते १९ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे. त्यापूर्वी उमेदवारांना अर्ज परीक्षा शुल्क भरावा लागणार आहे. 


रिक्त पदे भरतीच्या अनुषंगाने अधिक माहिती/निकष/पात्रता/अटी शर्ती व इतर तपशिल WWW.cdccbank.co.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अर्ज स्विकारणेची अंतिम तारीख दिनांक १९ ऑक्टोबर रात्री १२.०० वाजेपर्यंत राहील. त्यानंतर बँकेकडे थेट किंवा पोस्ट/कुरिअर व्दारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments