BSNL Vs Jio : बीएसएनएलची जिओला तगडी टक्कर! १ वर्षांच्या प्लॅनमध्ये तुमच्यासाठी बेस्ट कोण?
By दरारा २४ तास |
BSNL Vs Jio : आज आम्ही तुम्हाला Jio आणि BSNL या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या एका वर्षाच्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. दोन्हींची तुलना केल्यास तुम्हाला कोणता योग्य आहे, हे ठरवता येईल.
featured-img
BSNL Vs Jio : बीएसएनएलची जिओला तगडी टक्कर! १ वर्षांच्या प्लॅनमध्ये तुमच्यासाठी बेस्ट कोण?
googleNews
BSNL Vs Jio : टेलिकॉम मार्केटमध्ये जिओच्या आगमनानंतर डझनभर कंपन्यांनी कायमस्वरुपी आपला गाशा गुंडाळला. आधी एक वर्षी फ्री इंटरनेट आणि कॉलिंग दिल्यानंतर जिओ अजूनही आकर्षक ऑफर्स आणत आहे. जिओच्या प्रत्येक प्रकारच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. मात्र, आता सरकारी कंपनी बीएसएनएलमध्ये टाटांनी गुंतवणूक सुरू केल्यापासून जिओला तगडा स्पर्धक मिळाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांत जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली होती. त्यानंतर अनेकांनी जिओकडून बीएसएनएलकडे आपला मोर्चा वळवला.
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आजकाल लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. याशिवाय, अनेक लोक त्यांचे नंबर बीएसएनएलमध्ये पोर्ट करत आहेत. बीएसएनएलकडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे प्लॅन आहेत, जे जिओपेक्षा खूपच स्वस्त आहेत. मात्र, देशात बीएसएनएलची फोरजी सेवा अद्याप सुरू झालेली नाही. BSNL आपल्या 4G सेवेची तयारी करत आहे. बीएसएनएलची 4जी सेवा पुढील वर्षभरात संपूर्ण देशात सुरू होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला Jio आणि BSNL या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या एका वर्षाच्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. दोन्ही प्लानची तुलना करून तुम्हाला बेस्ट प्लॅन निवडण्यास मदत होईल.
बीएसएनएलचा एक वर्षाचा प्लॅन काय आहे?तुम्ही BSNL चा प्लॅन १९९९ रुपयांमध्ये ३६५ दिवसांच्या वैधतेसह खरेदी करू शकता. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज ३GB डेटा दिला जाईल. अनलिमिटेड कॉलिंगसोबतच दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधाही प्लॅनमध्ये समाविष्ट आहे.
जिओचा एक वर्षाचा प्लॅनजिओचा ३६५ दिवसांसाठीचा प्लॅन ३५९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २.५ GB डेटा दिला जाईल. अनलिमिटेड कॉलिंगसोबतच दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधाही प्लॅनमध्ये समाविष्ट आहे. आता दोन्ही प्लॅन आणि त्यांची वैशिष्ट्ये पाहून तुम्हाला कोणता योग्य वाटतो. ते सहज ठरवू शकता.
साभार-लोकमत
0 Comments