Ticker

6/recent/ticker-posts

संदीप विलास नागापुरे या तरुणाचा बोगस डॉक्टरच्या इलाजामुळे मृत्यू!



जुनगाव :प्रतिनिधी,
बोगस आणि झोला छाप डॉक्टरांनी सर्वत्र धुमाकूळ माजवला आहे आणि बोगस इलाजामुळे अनेकांचे जीव जात आहेत तर अनेक वेगवेगळ्या व्याधीने ग्रस्त होत आहेत. मात्र प्रशासन या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यास धजत नसल्यामुळे बोगस डॉक्टरच्या भरोशावर लाखो करोडो ची माया या बोगस डॉक्टरांनी जमविली आहे.
अशीच एक घटना मूल तालुक्यातील बोंडाळा येथे उघडकीस आली असून शेजारीच असलेल्या नांदगाव येथे उपचारासाठी दुचाकी वर भावासोबत बसून गेलेला संदीप विलास नागापुरे हा मृत होऊनच घरी परतला.
या घटनेबाबत सविस्तर असे की, बेंबाळ पोलीस चौकीच्या हद्दीत येणाऱ्या बोंडाळा (लहान) संदीप विलास नागापुरे याची प्रकृती बरी नसल्यामुळे त्याच्या भावाने त्याला दुचाकी वर बसवून त्याच्या आई समवेत नांदगाव येथील डॉक्टर देवकुमार बुधक यांच्या दवाखान्यात भरती केले. त्यानंतर डॉक्टरने सलाईन लावली काही वेळाने तो व्यक्ती म्हणजेच संदीप हा अजिबात निर्जीव पडला असल्याची त्याच्या भावाच्या लक्षात आले. मात्र डॉक्टरांनी त्याच्या भावाला मुल किंवा चंद्रपूर येथे घेऊन जाण्यास सांगितले. परंतु सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या भावाने याच दवाखान्यात मृत व्यक्ती झाला असता मृत व्यक्तीला इतर दवाखान्यात कसे काय नेऊ असा प्रश्न केला. मात्र डॉक्टरने त्याचे काहीही ऐकले नाही. व स्वतः भाड्याच्या गाडीवाल्याला फोन करून त्याला मुल ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले.
त्याला मुल येथे नेत असताना बेंबाळे येथील आरोग्य केंद्रात दाखवण्यात आले असता तो मृत झाला असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती मिळाली आहे.
   सदर घटनेची पोलिसात तक्रार झाली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेत ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रवाना केले आहे.
      मात्र बुधकर डॉक्टर यांच्या दवाखान्यात आला असता त्याला इलाज करण्यास डॉक्टरने नकार दिल्यामुळे डॉक्टरवर खोटा आरोप आणून त्याला फसवण्याचे कारस्थान रचल्या जात असल्याची चर्चा नांदगावात ऐकायला मिळत आहे. यातील सत्यता काय? त्याचा मृत्यू चुकीच्या उपचारामुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे हे शवविच्छेदन अहवाल आल्यावरच कळणार आहे. पुढील तपास ठाणेदार सतीश सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पीएसआय बनसोड करीत आहेत.

Post a Comment

0 Comments