तालुका प्रतिनिधी
ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या राघोजी भांगरे यांची जयंती आज 08 नोव्हेंबर 2022 रोजी पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथे "बिरसा क्रांती दल" शाखा जुनगाव च्या वतीने साजरी करण्यात आली.
याप्रसंगी बिरसा क्रांती दलाचे सर्व पदाधिकारी सदस्य व सर्व समाजातील समाज बांधव उपस्थित होते.
गोरगरिबांवर भरमसाठ कर्ज सावकारी करणाऱ्यांनी दिली. व सावकारी फास शेतकऱ्यांच्या गळ्याभावती आवळला गेला. या विरोधात राघोजी भांगरे यांनी लढा उभारला. आणि ब्रिटिशांना सडोकी पडू करून सोडले. त्यांचेवर राजद्रहाचा खटला भरला गेला. आणि कुटील इंग्रजांनी त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी त्याकाळी वकीलही मिळू दिला नव्हता. त्यांना आद्य क्रांतिकारक अशी पदवी बहाल करण्यात आली. राघोजी भांगरे यांनी भिल्ल आदिवासी जमातीच्या टोळ्या उभा केल्या. त्यांच्या या टोळक्यात अनेक पराक्रमी तरुण सामील झाले. सन1838 साली रतनगड आणि संघर्ष किल्ल्यांच्या परिसरात राघोजी भांगरे यांचं बंड उभारलं गेलं. आजही त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले जातात. मात्र सरकारी दरबारी उशिरा त्यांची दखल घेतली गेली. ही खंत सर्वांनाच आहे.
166 व्या त्यांच्या स्मृतिदिनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाणे सेंट्रल जेल व जिल्हाधिकारी कार्यालयात जवळील मुख्य चौकास आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे असे नामकरण करण्यात आले.
0 Comments