Ticker

6/recent/ticker-posts

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सपशेल अपयशी त्यांनी राजीनामा द्यावा- वंचित चे नेते राजू झोडे




बल्लारपूर (चंद्रपूर ) किरण घाटे- जिल्ह्यातील सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, गोंडपिपरी, बल्लारपूर, राजुरा आदीं तालुक्यात नित्य वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यात या मागील दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला तर राजुरा, बल्लारपूर तालुक्यातील जनावरांवर वाघाने हल्ला करून ठार केले. दररोज कुठे ना कुठे वाघाच्या हल्ल्यात जिल्ह्यातील निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जात आहे तरी जिल्ह्यातील पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे
झोपेचे सोंग घेऊन आहेत.तदवतंच जिल्ह्यातील गंभीर समस्यां कडे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप उलगुलान संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष राजू झोडे यांनी आज केला.
या जिल्ह्यात गेल्या ऑक्टोंबर महिन्यात तब्बल सात जणांचा वाघाने बळी घेतला तरीही वनमंत्री "वाघ वाचवा" चा नारा देत असून माणसाचा जीव कोण वाचवणार? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना वीस लाख रुपये निधी जाहीर केले परंतु माणसांची किंमत ही पैशाने मोजून मोकळे होता येणार नाही. दररोज होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड दहशत पसरली असून जंगलालगतच्या शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झालेले आहे. अश्यातच वन विभागाने कठोर निर्णय घेऊन वाघांचे होणारे हल्ले थांबवण्यासाठी प्रयत्न करावे तसेच वनमंत्र्यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन तात्काळ उपायोजना कराव्या . वन्य प्राण्यांचे होणारे हल्ले जर वनमंत्र्यांना थांबवता येत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ही राजू झोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली केली आहे.

Post a Comment

0 Comments