Ticker

6/recent/ticker-posts

नांदगाव ग्रामपंचायत चे धार्मिक स्थळांकडे दुर्लक्ष.. ‌माजी उपसरपंच विजय जाधव यांचा आरोप



नांदगाव ग्रामपंचायत चे धार्मिक स्थळांकडे दुर्लक्ष.. 
 ‌
माजी उपसरपंच विजय जाधव यांचा आरोप

           मुल: तालुक्यातील नांदगाव हे प्रतिष्ठित तसेच चहुबाजूने अनेक गावांनी संपर्क असलेले गाव.नांदगाव म्हणून या गावाची प्रतिष्ठा आहे. तसेच राजकीय दृष्ट्या विचार केल्यास या गावात जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱरे धुरंदर नेते विविध पक्षात असल्याने हे गाव राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील म्हणून ओळखल्या जाते. 


त्याचप्रमाणे या गावात धार्मिक स्थळ असून अनेक भाविक भक्त या मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाऊन नतमस्तक होऊन पदस्पर्श करतात. उत्तम बाजारपेठ असलेले हे गाव श्रद्धास्थानाचे ठिकाण आहे. या गावात अनेक वर्षापासून तिरुपती बालाजी मंदिर असून या मंदिराच्या देखभालीसाठी कमिटी नेमण्यात आलेली आहे.

 परंतु गावाबाहेर हनुमान मंदिर असून त्यालगत श्रीकृष्ण मंदिराचे सुद्धा बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिर परिसरात माजी विधान परिषदेचे आमदार जैनुद्दीन जवेरी यांच्या सहकार्यातून व्यायामाचे साहित्यौ, मुलांचे खेळण्याचे साहित्य, भाविकांच्या विचारासाठी बैठकीची व्यवस्था म्हणून बाकी, कटले देण्यात आले.यावेळी जि प चे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांचे सहकार्य लाभले. तसेच श्रीकृष्ण मंदिरात त्यांच्याच प्रयत्नाने जिला परिषदेकडून भजन साहित्य व लाऊड स्पीकर देण्यात आला.


 यावेळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रशांत बांबोडे यांनीही या मंदिर परिसराच्या स्वच्छते साठी अविरत प्रयत्न केले.त्यावेळी मंदिर आणि मंदिराचे परिसर स्वच्छ होते.आणि अनेक भाविक मंदिरात प्रवेश करून नतमस्तक होत होते. आणि विसावा घेत होते. गावातील लहान मुलं या ठिकाणी येऊन खेळण्याचे आणि व्यायाम करीत होते. परंतु सद्यस्थितीत प्रस्तुत प्रतिनिधीने या मंदिराची प्रत्यक्षरीत्या पाहणी केली असता मंदिर परिसरात कचरा तयार झाला असून बसण्यासाठी असलेली बाकी संपूर्णपणे तोडफोड करण्यात आलेली आहे.

 तसेच मंदिरालगत विठ्ठल रुक्माई चे मंदिराचे काम विनोद अहिरकर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले. परंतु अजूनही सदर बांधकाम अर्धवट आहे.गावातील गुरेढोरे या मंदिरात चरासाठी जात असतात.अशी दयनीय अवस्था या मंदिर परिसराची झाली असून याकडे ग्रामपंचायतचे अक्षय दुर्लक्ष असल्याचा आरोप गावातील माजी उपसरपंच विजय जाधव यांनी केला आहे.

सदर मंदिराच्या दुरुस्तीसाठी व देखभालीसाठी ग्रामपंचायत तर्फे एक नियोजन समिती स्थापन करावी व ग्रामपंचायत फंडातून अथवा लोकवर्गणीतून या मंदिराची सुधारणा करण्यात यावी आणि तसे अधिकार त्या समितीला देण्यात यावे अशी मागणी वजा विनंती माजी उपसरपंच विजय जाधव यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments