Ticker

6/recent/ticker-posts

वृक्षारोपण करून सत्यशोधक समाज स्थापना दिवस साजरा -ग्रामपंचायत शिदूर यांचा उपक्रम -सरपंच मंजुशा मते व तंटामुक्ती अध्यक्ष धर्मपाल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती

वृक्षारोपण करून सत्यशोधक समाज स्थापना दिवस साजरा


-ग्रामपंचायत शिदूर यांचा उपक्रम -सरपंच मंजुशा मते व तंटामुक्ती अध्यक्ष धर्मपाल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती

धर्मपाल कांबळे(जिप्र)
चंद्रपूर - प्रतिनिधी : तालुक्यातील शिदुर ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करून "सत्यशोधक समाज स्थापना" दिवस साजरा करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्वांसाठी एकच सार्वजनिक सत्यधर्म सांगितला. 

या काळात ब्राह्मण घट जोशी इत्यादी लोकांच्या दहशतवातून शूद्र लोकांस मुक्त करण्याकरिता व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे हजारो वर्षे शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटणाऱ्या व्यवस्थेला नेस्तनाबूत केले. यातून परावर्तित करण्याकरिता समुपदेश व विद्याद्वारे त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता धर्म व व्यवहार संबंधी ब्राह्मणांचे बनावट,व कार्य साधक ग्रंथांपासून मुक्त करण्याकरिता काही सुज्ञ शूद्र मंडळींनी हा समाज 24 सप्टेंबर 1873 रोजी स्थापन केला. त्याची आठवण सतत राहावी. आणि समाजाला नवी दिशा मिळावी, समाज जागृत व्हावा या उद्देशाने हा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत शिदुर च्या वतीने हा दिवस साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी सरपंच मंजुषा मते, तंटामुक्ती अध्यक्ष धर्मपाल कांबळे, ग्रामपंचायतीच्या सचिव विद्या घुंगरूडकर, शुभम झाडे, स्वप्निल बुडेकर, श्रीकांत भोयर, दिलीप थेरे, ज्ञानेश्वर डहाके, स्वरूप कांबळे, ग्रामपंचायत शिपाई रमेश मानकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments