पोंभुर्णा: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ते पदाधिकारी मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेची बुलंद तोफ, माजी मंत्री आमदार भास्कर जाधव हे धडाडणार आहेत. ते कोणाच्या उरात धडकी भरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिनांक 27 सप्टेंबर रोजी होऊ घातलेला या मेळाव्याला शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ साहेब, चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम साहेब, जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी एक वाजता सुमन मंगल कार्यालयात कार्यकर्ते पदाधिकारी व शिवसैनिकांनी, महिला आघाडीने उपस्थित रहावेत असे शिवसेने च्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments