देसाईगंज वडसा येथील बावीस वर्षीय महिला बेपत्ता!
पोलीस विभाग सहकार्य करत नसल्याचा बेपत्ता महिलेच्या पतीचा आरोप
चंद्रपूर: गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा येथील बावीस वर्षीय महिला दोन वर्षीय चिमुकल्या मुलाला पती जवळच सोडून अचानक बेपत्ता झाली आहे. या महिलेच्या रहस्यमय बेपत्ता होण्याचे कारण अद्याप पोलिसांना समजू शकले नसून तिचा शोध घेण्यात पोलीस समर्थ ठरले आहेत. असा आरोप पती आकाश शर्मा यांनी केला आहे. ऋतुजा गलगले , 22 वर्ष असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे.
महाराष्ट्रात महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून दरवर्षी हा आकडा वाढतच आहे. हरवलेल्या महिला आणि मुलींच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून याची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर वडसा पोलिसांनी गांभीर्याने मुद्दा लक्षात घेऊन या महिलेचा शोध घेणे गरजेचे आहे. दोन वर्षीय मुलगा घरी रडून आईच्या विरहात बेजार होत आहे तर पती लहान मुलाला घेऊन गावोगावी तिच्या शोधात फिरत आहे.सदर महिला कोणाला आढळल्यास +91 97648 29621 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
महाराष्ट्रात 3 वर्षांमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त महिला बेपत्ता !
0 Comments