शेतकऱ्यांची कामे रखडली!तात्काळ तलाठी नियुक्त करण्याची मधुकर पवार यांची मागणी
विजय जाधव तालुका प्रतिनिधी
मूल : तालुक्यातील नांदगाव हे गाव बहु चर्चित असून राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. येथील तलाठी साजात अनेक गावे समाविष्ट आहेत. नांदगाव, गोवर्धन, दिघोरी, पिपरी देशपांडे, चेक ठाणा, बोंडाळा बुद्रुक, बोंडाळा खुर्द, देवाळा, जुनगाव इत्यादी गावे समाविष्ट असून नांदगाव येथे ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये तलाठी कार्यालय आहे.
परिसरातील शेतकरी बांधव विविध कामे घेऊन पटवारी कार्यालयात येतात. मात्र येथील तलाठी टेकाम हे अपघातात जखमी झाल्याने बेंबाळ च्या तलाठी महोदयाकडे प्रभार सोपविण्यात आला. परंतु आठवड्यातून एकही दिवस प्रभारी तलाठी कार्यालयात दिसत नसल्याने विविध कामे घेऊन येणाऱ्या जनतेचा व शेतकऱ्यांचा भ्रमनिराश होत आहे. आल्या पावलीच त्यांना परत जावे लागत आहे.
तलाठी कार्यालय असूनही बेवारस अवस्थेत असल्याने जनतेची कामे रखडलेली आहेत. काम असेल तर बेंबाळला या अशी सूचना प्रभारी तलाठी देत असल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
माननीय तहसीलदार महोदयांनी या बाबीची तात्काळ दखल घेऊन नांदगावला स्थायी तलाठी देण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकरराव पवार यांनी केलेली आहे.
0 Comments