Ticker

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी- जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोष सिंह रावत

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी- जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोष सिंह रावत


===================
जिवनदास गेडाम (विशेष प्रतिनिधी)
===================
 चंद्रपूर:अती पावसामुळे दांबगाव येथील मामा तलाव फुटल्याने तलावाच्या पाण्याने शेकडो हेक्टर शेतीचे पूर्ण नुकसान झाले. यावर्षीचे पीक हातून गेल्याने ३५ शेतकरी हवालदिल झाले आहेत. काहींनी तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इतकी मोठी नुकसान झाली. सर्वच शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी यासाठी ३५ बाधित शेतकऱ्यांच्या वतीने काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, माजी जी.प. अध्यक्ष संतोशसिंह रावत यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार मुल यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 १) पूर्ण पीक गेल्याने जेवढी नुकसान झाली तेवढी भरपाई शासनाने द्यावी २) फुटलेल्या तलावाची पाळ बांधून द्यावी ३) रेतीचा उपसा मशिनद्वारे काढून शेतीची सुधारणा करुन द्यावी ४) बाधित शेतकऱ्यांचे चालू वर्षाचे पीक कर्ज माफ करावे ५) नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरित द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या.


निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, जिल्हा काँग्रेसचे महासचिव घनश्याम येनुरकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, कृ.उ.बा.स. संचालक किशोर घडसे, वी का. सोसायटी अध्यक्ष संदीप करमवार, अखिल गांग्रेडिवार, हसन वाढई, बंडूभाऊ गुरनुले, ओबीसी सेल राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, युवक अध्यक्ष पवन निलमवार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, विनोद कामडी, महिला ता. अध्यक्षा रुपाली संतोष्वार, मा.न.से. लीना फुलझेले, सचिव शामला बेलसरे, सीमा भसारकर, फर्जणा शेख, युवक उपाध्यक्ष संदीप मोहबे, अतुल गोवर्धन, अभय चिटलोजवार, विश्णू सादमवार, रोशन भुरसे रुपेश नीकोडे, यांचे उपस्थितीत मां. उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम व तहसीलदार मृदुला मोरे यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे निवेदन देण्यात आले.


बाधित शेतकरी.
===================
 सुनील किरमे, लहानुबाई कीर्मे, जनार्दन नैताम, चोखा कुकुडकर, दसराबई कोठारे, दारोबाई भसारकर, रेश्मा भसारकर, रेश्मा नैताम, रत्नमाला थरकर, महादेव थेरकर, अंबादास गेडाम, नगुबाई चलाख, रोशनी बारसागडे, आनंदराव नैताम, मायाबाई नैताम, अमरनाथ गेडाम, सागर बारसगडे, कमल बारसागडे, नारायण दुधबले, उष्टुजी दुधबाळे, लक्ष्मण बारसागडे, गोपाळ नैताम, हिरामण बारसागदे, गिरिधर बुरांडे, कमल धोड्रे, केशव बारसागडे, गिरिधर बुरांडे, कमल धोड्रे, केशव बुरांडे, सुधाकर रायपूरे, तुळशीदास अवताडे, वर्षा बारसागडे, नेताजी बुरांडे, लीलाबाई बुरांडे, वासुदेव कुक्कुडकर, देविदास वाळके, श्रीनिवास सातपुते यांची नुकसान मोठ्या प्रमाणात झाली आहे.



,

Post a Comment

0 Comments