ट्रॅक्टर उलटली! आदिवासी तरुणाचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू...
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
विजय जाधव (प्रतिनिधी)
नांदगाव: मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व बेंबाळ पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या देवाडा बुज येथे ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात देवाळा बुज येथील आदिवासी तरुण नागेश अरुण मेश्राम वय अंदाजे 21 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन जन जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ही दुर्घटना काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मुल पोलिसांना होताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. घटनास्थळ पंचनामा करून जेसीबी च्या साह्याने सहाय्याने ट्रॅक्टर उचलून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शबाविच्छेदनगृहात मुल येथे पाठवण्यात आला. मात्र काल रात्री सवविच्छेदन होऊ न शकल्याने आज शुक्रवार रोजी शवविच्छेदन होईल असे सूत्रांनी सांगितले आहे. ट्रॅक्टर शामराव आरेकर यांच्या मालकीची असून त्यांचा मुलगा दारू पिऊन ट्रॅक्टर चालवत होता त्याचेवर कारवाई व्हावी अशी मागणी व जा चर्चा गावात होताना दिसली.
दरम्यान आई-वडिलांचा एकुलता एक तरुण मुलगा काळाने हिरावल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
ट्रॅक्टर चालक अत्यंत मध्य धुंद अवस्थेत गाडी चालवत होता असे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले आहे. चालकाच्या अति मध्य धुंद अवस्थेत असल्यामुळेच एका निष्पाप आदिवासी तरुणाचा जीव गेल्याच्या प्रतिक्रिया गावात व परिसरात उमटत आहेत. शासनाने कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणीही गाववासी यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading