शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेची मुसंडी! जिल्हाप्रमुखांचा जिल्ह्यात झंझावाती दौरा व आढावा बैठका ...

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेची मुसंडी!


जिल्हाप्रमुखांचा जिल्ह्यात झंझावाती दौरा व आढावा बैठका ...

मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी,

अहेरी: विधानसभा निवडणुकीत भरघोश यश मिळाल्यानंतर विजयाच्या आनंदाने उत्स्फूर्त होऊन गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट मजबुतीने पाय रोवत आहे.

शिवसेनेचे नेते तथा पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ भाई शिंदे यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व गावात शिवसेनेची शाखा निर्माण करण्याचा चंग शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी बेलसरे यांनी बांधलेला आहे. 

माननीय राकेश भाऊ बेलसरे शिवसेना जिल्हाप्रमुख गडचिरोली

त्यानुसार त्यांनी तालुक्या- तालुक्यांचा दौरा सुरू केला असून पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. सर्व स्तरावर कार्यकारणी गठीत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जिल्हाप्रमुख स्वतः हिरहिरीने  जिल्ह्यात झंझावाती दौरे करत आहेत व जनसंपर्क वाढवलेला आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना शिंदे गट गडचिरोली जिल्ह्यात आपले पाय मजबूत केलेले दिसेल यात शंका उपस्थित व्हायला नको!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू