अवैध रेती साठ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

अवैध रेती साठ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष


✍️संतोष गोंगले,तालुका प्रतिनिधी

.✍️दरारा 24 तास न्यूज नेटवर्क...
मूल: प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून रेती तस्करांनी तालुक्यात अनेक ठिकाणी रेतीचा साठा करुन ठेवला आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचान्यांना रेती साठ्याबदल माहिती असताना कारवाई न करता याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे.


तालुक्यातील जानाळा प्रादेशिक वनविभागाच्या कक्ष क्रमांक ७१५ मध्ये बंधारा बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने आवश्यकतेपेक्षा अधिक २५ ते ३० ब्रास अवैधरित्या रेतीचा साठा करून ठेवला आहे. यात मोठ्या प्रमाणात अर्थकारण झाल्याने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कारवाई करण्याऐवजी बध्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. प्रादेशिक वनविभागाच्या कक्ष क्रमांक ७१५ ला लागून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफरझोन क्षेत्र आहे. यामुळे येथे वन्यप्राण्यांचा वावर असल्याने मानव-वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांना जंगलात जाण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. परंतु, संबंधित कंत्राटदाराने मात्र वन्यप्राण्यांच्या जिवाशी खेळून रात्रीच्या सुमारास जवळपास २५ ते ३० ब्रास अवैध रेती साठा केल्याचे दिसून येत आहे. तरीसुद्धा वनविभागाचे अधिकारी अवैध रेती साठ्यावर कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

तसेच अशाच प्रकारचे रेतीचे अवैध साठे तालुक्यातील अनेक भागात रेतीतस्करांनी केले आहे. यासंदर्भात तालुक्यातील महसूल, पोलीस आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना माहिती असताना कारवाई केल्या जात नाही, हा मात्र संशोधनाचा विषय आहे. दरम्यान, उघकीस आलेल्या जानाळा लगतच्या अवैध रेती साठ्याकडे लक्ष देवून संबंधित कंत्राटदार आणि कंत्राटदारास अभय देत असलेल्या संबंधित वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

संबंधित कंत्राटदार एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने कारवाई न करण्यासाठी एका मोठ्या नेत्याचा वनअधिकाऱ्यावर दवाव असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू