नांदगाव सह आठ गावातील पाणी प्रश्न पेटला ? 🌑सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाऊ भोगावार यांच्या नेतृत्वात सीईओ यांना निवेदन 🌍आमदार सुधीर मुनगंटीवार यांनाही साकडे

नांदगाव सह आठ गावातील पाणी प्रश्न पेटला ?


🌑सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाऊ भोगावार यांच्या नेतृत्वात सीईओ यांना निवेदन

🌍आमदार सुधीर मुनगंटीवार यांनाही साकडे 

✍️मुल: तालुका प्रतिनिधी ...
 ===================
जाहीरात


माननीय राकेश भाऊ बेलसरे शिवसेना जिल्हाप्रमुख गडचिरोली 
===================
उन्हाळ्याची चाहूल लागली की जिकडे तिकडे पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू होते. आणि का होऊ नये? पाणी हे जीवन आहे, जीवन आहे तरच मानव आहे, हे ब्रीदवाक्य घेऊन सरकारही प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुख सुविधांकडे लक्ष देत असते. म्हणूनच की काय! सरकारला "सरकार मायबाप" असे संबोधल्या जाते.
आणि माय बापानेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्याची जबाबदारी असते. अर्थात जनता ही सरकारवर अवलंबून असते. अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची असते. त्या गरजा पूर्ण करता आल्या नाही तर त्या कुटुंबाप्रमुखाकडे कुटुंबातील लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच बनतो. तशीच काहीशी परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात बघावयास मिळत आहे. 
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. अनेक ग्रामपंचायतींनी वीज देयके थकविल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी नळ योजना, पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत.

मुल तालुक्यातील नांदगाव, बेंबाळ गडेश्वरला, जुनासुरला व इतर आठ गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेत या सर्व आठही गावांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उचलली. काही दिवस सुरळीत पिण्याचे पाणी मिळायला लागले. मात्र कालांतराने या योजनेला अखेरची घरघर लागली आणि ही योजना बंद चालू, बंद चालू राहू लागली. 
मागील काही महिन्यांपासून बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद असल्यामुळे या योजनेत समाविष्ट असणाऱ्या आठही गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीरपणे भेडसावत आहे. या बाबीची गंभीर दखल शासनाने घ्यावी, मात्र शासन आणि प्रशासन गंभीर नसल्याचे दिसताच नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप जी भोगावार यांनी पुढाकार घेऊन गावातील महिला व नागरिकांना सोबत घेऊन मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर तसेच या विभागाचे आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे मागण्यांचे निवेदन सोपविले आहे. येणाऱ्या 15 दिवसाच्या आत सदर योजना कार्यान्वित करून पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आलेला आहे.आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन शिष्ट मंडळाला तात्काळ समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.आता प्रशासन या पाणी प्रश्नावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवेदन तंटामुक्ती अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जी भोगावार यांच्या नेतृत्वात देण्यात आले. याप्रसंगी माजी उपसरपंच विजय जाधव, नीलकंठ जी नरसपुरे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर जी पवार, व महिला आणि पुरुष उपस्थित होते.

https://www.facebook.com/share/v/1Bw5aQe9AC/

https://youtu.be/Qi6kIBKEd2Q?si=tpZuJdTNdqY7Tj0I


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू