अहेरी पं. स. येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण

अहेरी पं. स. येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण


मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी

अहेरी: डिजिटल इंडिया मोहिमेला गती देण्यासाठी नॅसकॉम फाउंडेशनतर्फे अत्याधुनिक साधनाचा व्यवहारिक वापर कसा करावा व नवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे. 

त्याअनुषंगाने नुकतेच १५ फेब्रुवारी रोजी अहेरी येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 उद्घाटन येथील गटविकास अधिकारी एल. बी. जुवारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणात मोबिलायझर, रोजगारसेवक आणि इतर सहभागींना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यात स्मार्टफोन, इंटरनेट, डिजिटल पेमेंट, शासकीय सेवांची ऑनलाइन उपलब्धता, सायबर सुरक्षा या विषयावर ट्रेनर शुभांगी रामगोनवार यांनी सविस्तरपणे माहिती दिली.

 अहेरी तालुक्यात पहिल्यांदाच नॅसकॉम फाउंडेशनतर्फे डिजिटल तंत्रज्ञानाचे धडे देण्यात आले. हा उपक्रम डिजिटल साक्षरता आणि जनजागृती प्रशिक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू