आत्मविश्वास वाढविण्यासाठी क्रिकेट स्पर्धा महत्त्वाच्या : प्रा. चिन्ना चालूरकर

आत्मविश्वास वाढविण्यासाठी क्रिकेट स्पर्धा महत्त्वाच्या : प्रा. चिन्ना चालूरकर


🌆दरारा 24 तास न्युज नेटवर्क

✍️मनोज गेडाम तालुका प्रतिनिधी... 

अहेरी : खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बरीच मोठी उर्जा मिळते. जिद्द, चिकाटी, संयम, अंगात असलेल्या सुप्तकला गुणांची उधळण करता येते. क्रीकेटसारख्या मैदानी खेळातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढविण्यास बरीच मदत होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सांघिक खेळाकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन मराठी विभाग प्रमुख प्रा. चिन्ना चालूरकर यांनी केले.
येथील राजे विश्वेश्वरराव कला व वाणिज्य महाविद्यालयात ४ फेब्रुवारीला शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे, प्रा. डॉ. सुरेश डोहाने, प्रा. डॉ. संतोष डाखरे, प्रा. डॉ. कैलास निखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत महाविद्यालयातील विविध संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विजेत्या संघाला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ. लाड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन संतोष उसेंडी यांनी तर आभार किरण कुरुसामी यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुनील ताजने यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू