रुग्णांना फळ, बिस्कीट वाटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा
रुग्णांना फळ, बिस्कीट वाटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे पूर्व विदर्भ संघटक किरण भाऊ पांडव,विधानपरिषद आमदार,डॉ मनिषाताई कायंदे,यांच्या सूचनेनुसार पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्रजी भोंडेकर,जिल्हा संपर्कप्रमुख किशोरजी राय,शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते,उपजिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला,यांच्या मार्गदर्शनात,विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर,शिवसेना तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ,बिस्कीट वाटप करण्यात आले,तर प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव मोरे येथील रुग्णांना सुध्दा फळ,बिस्कीट पुडे वाटप करून दि. 9 फेब्रुवारी रविवारला शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख संतोष पार्लेवर,समनवयक व्यंकटेश चिप्पावार,भय्याजी बुरांडे,वेदप्रकाश आगरकर,सचिन भसारकर,अविचल जाधव, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा