नांदगाव सह आठ गावांचा पाणीपुरवठा दोन महिन्यापासून बंद! सरपंच व ग्रामपंचायत कमिटी निष्क्रिय असल्याचा माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांचा आरोप
नांदगाव सह आठ गावांचा पाणीपुरवठा दोन महिन्यापासून बंद!
सरपंच व ग्रामपंचायत कमिटी निष्क्रिय असल्याचा माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांचा आरोप
✍️दरारा 24 तास न्यूज नेटवर्क...
चंद्रपूर : बेंबाळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे शुद्ध पाणी आठ गावांतील जनतेला वरदान ठरले होते. परंतु निष्क्रिय ग्रामपंचायतींनी वीज देयके थकविल्याने दोन महिन्यांपासून योजनेचा वीज पुरवठा महावितरणाने खंडित केला आहे. परिणामी नागरिकांना गावातील विहीर-बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
नांदगाव हे गाव या योजनेतील मोठे गाव आहे. या गावात राजकीय पुढारी वास्तव्याने असतात. मात्र या गावच्या समस्यांकडे पुढार्यांचे दुर्लक्ष झाले की काय? असा प्रश्न उपस्थित होणे सहाजिकच आहे.
नांदगाव ग्रामपंचायतीचे वसुली अभियान थकबाकी जमा झाली असताना सुद्धा विजेचे बिल का भरल्या जात नाही असा प्रश्न माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांनी केला आहे. येथील ग्रामपंचायत नागरिकांना सुख सोयी, सुविधा देण्यात असमर्थ ठरली आहे. येथील सरपंच निष्क्रिय असल्याचा आरोप माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांनी केला आहे.
नांदगाव ग्रामपंचायतीचे वसुली अभियान थकबाकी जमा झाली असताना सुद्धा विजेचे बिल का भरल्या जात नाही असा प्रश्न माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांनी केला आहे. येथील ग्रामपंचायत नागरिकांना सुख सोयी, सुविधा देण्यात असमर्थ ठरली आहे. येथील सरपंच निष्क्रिय असल्याचा आरोप माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांनी केला आहे.
बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अनेक महिन्यापासून बंद असल्याने अशुद्ध पाणी पिऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मात्र प्रशासन नागरिकांना शुद्ध पाणी पाजण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे.
नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करणे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कर्तव्य आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून प्रादेशिक पाणी पुरवठा खंडित असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे.
बेंबाळ प्रादेशिक योजनेच्या पाण्यावर विसंबून असलेल्या परिसरातील नांदगाव, गोवर्धन, घोसरी, नवेगाव भुज, कोरंबी, चेक दुगाळा, बाबराळा, जुनासुर्ला येथील नागरिकांना अन्य स्रोतातील विहीर-बोअरवेलच्या अशुद्ध पाण्यावर तहान भागविण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
सद्यःस्थितीत उन्हाची दाहकता वाढत असून भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर जात आहे. त्यामुळे शुद्ध पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधीसुद्धा शुद्ध पाण्याच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. कधी नव्हे ते पाणी समस्या पेटली असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.
जलजीवन मिशन की जला विना मरण मिशन?
हर घर पाणी या उदात्त हेतूने जलजीवन मिशनच्या कामाला मंजुरी मिळाल्याने संबंधित कंत्राटदार दोन वर्षांपूर्वी गावातील सिमेंट रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून रस्ते विद्रूप केलेले आहेत. परंतु टाकीचे बांधकाम पूर्णत्वास आलेले नाही. मात्र, घोसरी ग्रामपंचायतअंतर्गत लालहेटी, बोंडाळा खुर्द व अन्य गावातील सिमेंट रस्त्याने मार्गक्रमण करणे जिकिरीचे झालेले आहे. जलजीवन मिशनमुळे गावातील पाणी समस्या मिटेल, अशी भाबडी आस होती. परंतु काम रखडलेले आहेत. तरीसुद्धा कंत्राटदार व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अनभिज्ञ आहेत. एकंदरीत या मिशनने समस्याच उभ्या केल्या आहेत. या समस्यांना मार्ग मोकळा करून समस्या विरहित गाव निर्माण करणे गरजेचे आहे.
बेंबाळ येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पूरक नळ पाणीपुरवठा योजना २०१३ मध्ये मंजूर झाली होती हे विशेष.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा