जूनगावात शिवछत्रपती स्मारक उभारू 🌍जन्मदिनानिमित्त अलकाताई आत्राम यांची ग्वाही 🎁जुनगाव येथे अलकाताईंचा वाढदिवस उत्साहात साजरा 🍞सरपंच राहुल भाऊ पाल यांचा पुढाकार। महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती

🌑जूनगावात शिवछत्रपती स्मारक उभारू

🌍जन्मदिनानिमित्त अलकाताई आत्राम यांची ग्वाही 


🎁जुनगाव येथे अलकाताईंचा वाढदिवस उत्साहात साजरा 

🍞सरपंच राहुल भाऊ पाल यांचा पुढाकार। महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती 

दरारा 24 तास...
चंद्रपूर: प्रतिनिधी तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळेच आणि प्रेमामुळे मी या पदापर्यंत येऊन पोहोचले, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, या तुमच्या प्रेमाची परतफेड तुमच्या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारू आणि तुमच्या कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन वाढदिवसाच्या निमित्ताने बोलताना भाजपा नेत्या अलकाताई आत्राम यांनी केले. त्या जूनगाव येथे सरपंच राहुल भाऊ पाल यांनी आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या कुमारी अलका आत्राम यांचा 12 मार्च रोजी वाढदिवस. त्यांचा वाढदिवस चंद्रपूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. तालुक्यातील जुनगाव येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा जूनगावचे सरपंच राहुल भाऊ पाल यांनी अलकाताईंचा वाढदिवस सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रतिष्ठित नागरिक व सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग जी पाटील पाल, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य विश्वेश्वर जी भाकरे, माजी सरपंच व पत्रकार जीवनदास गेडाम, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गजाननराव येलपुलवार, तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल दसरुजी चुधरी, उज्वल ग्राम संघाच्या पदाधिकारी प्रवर्तिका आशाताई मधुकर झाडे, इत्यादी पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या. 

याप्रसंगी कुमारी अलकाताई आत्राम यांचा राहुल भाऊ पाल यांनी सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराव आभारे व प्रकाश भाकरे यांनी केले.

कृपया आमच्या छोट्याशा यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करून एका मराठी माणसाला सपोर्ट करा, धन्यवाद, नमस्कार, जय महाराष्ट्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू