तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आशा दिवस उत्साहात साजरा
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने २२ मार्च २०२५ रोजी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे आशा दिवस आरोग्याच्या रणरागिणीचा गौरव व जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा . संगीता भांगरे गटविकास अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा समूह संघटक (आशा) शितल राजापूर वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पडगिलवार,डॉ. प्रशांत चौधरी मा. श्री एम. एस . नन्नावरे विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर आदी उपस्थित होते. यावेळी वर्षभर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात गीतगायन, नृत्य, पथनाट्य, रांगोळी, असे विविध कलाकृती आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक यांनी सादर केली. यावेळी सर्व विजयी आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक, यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा