आता महिलांना दीड हजार नव्हे 3000 मिळणार! राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा

आता महिलांना दीड हजार नव्हे 3000 मिळणार! राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा दरारा 24 तास न्युज नेटवर्क महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिलांना महालक्ष्मी योजनेतून दरमहा 3 हजार रुपये देणार आणि मोफत एसटी प्रवासाचा निर्णय घेणार असं राहुल गांधी म्हणाले. मुंबई : महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीपैकी एका गॅरंटीबद्दल माहिती देणार असल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे इतर गॅरंटीबद्दल सागंतील.मी तुम्हाला महालक्ष्मी योजनेबाबत माहिती देणार आहे. प्रत्येक महिलेच्या खात्यात 3 हजार रुपये प्रत्येक महिन्याला इंडिया आघाडीचं सरकार पाठवेल. महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये थेट खटाखट खटाखट खटाखट खटाखट खटाखट पाठवणार आहोत. महाराष्ट्रातील महिला बसमधून प्रवास करतील तेव्हा त्यांना बस तिकीट खरेदी करण्यासाठी एक रुपया द्यावा लागणार नाही. त्यांना मोफत प्रवास करता येईल. भाजपच्या सरकारनं महागाईचा त्रास, गॅस सिलिंडरच्या दराचा त्रास, बेरोजगारीचा त्रास सर्वाधिक महिलांना होतो. त्यामुळं महाराष्ट्राच्या महिलांच्या ख...