महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची..?

महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची..? -एडवोकेट अस्मिता अशोक टिपले वर्धा एडवोकेट, अस्मिता अशोक टिपले वर्धा ======================= अलीकडे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणली आहे. अनेक लाडकी बहिणींना दीड हजार रुपये महिना मिळतात..! आणि काही बहिणींना काही कारणाने त्यांचे अर्ज दाखल होऊन सुद्धा त्यांचा अर्ज बाद करण्यात आले आहे. दुसरी कडे निराधार महिलांना, घटस्फोटीत महिलांना, ज्येष्ठ नागरिक महिलांना, अशा अनेक महिलांना विविध योजने मार्फत शासनाकडून पैसे मिळतात. म्हणजे शासन त्याची काळजी करते असे म्हणायला हरकत नाही? परंतु पुढे त्यांच्या मुला, मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार? हा मूळ प्रश्न निर्माण झालेला आहे. अलीकडे सरकारी जिल्हा परिषदच्या अनेक मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गांवर आहे. मग त्या ग्रामीण/शहरी भागातील असेल आणि पुढील शिक्षण महाग झालेले आहे त्याचे काय? अशा अवस्थेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार? की लाडक्या बहिणीच्या मुला, मुलींना वाऱ्यावर सोडणार? हा चिंतेचा आणि चिंतनाची बाब आहे. लाडकी बहीण म्हणजे नेमकी काय? याची व्याख्या फार मोठी आहे. ...