एस पी साहेब चार-दोन पत्रकारांचे एन्काऊंटर करता का ? साले खुपच माजलेत ओ !
एस पी साहेब चार-दोन पत्रकारांचे एन्काऊंटर करता का ? साले खुपच माजलेत ओ ! दत्तकुमार खंडागळे, संपादक वज्रधारी, 9561551006 सध्या सांगली जिल्ह्यात कायदा-व्यवस्थेचा प्रश्न बिकट होत चाललाय. सगळे अवैध धंदे तेजीत आहेत. खासगी सावकारी, गुटखा, मटका, वाळूचोरी, सेक्स रॅकेट, खून, मारामा-या, ड्रग्ज विक्री, गावठी दारू, बनावट दारू विक्री सगळं सगळं खुलेआम सुरू आहे. सगळं बिनबोभाट सुरू आहे. अवैध धंदे करणारे हे सगळे समाजसुधारक सध्या तेजीत आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात त्यांचा यथोचित मानसन्मान होतो. त्यांना प्राधान्याने सेवा मिळते. त्यांची योग्य पध्दतीने बडदास्त ठेवली जाते. सगळं कसं सुरूळीत आहे. पण खरी अडचण आहे ती पत्रकारांची. पत्रकार साले माजलेत. काहीही गरज नसताना अवैध धंद्यांची बातमी लावतात. ड्रग्ज पकडल्याची, विक्रीची बातमी लावतात. गांजा विक्रीची बातमी लावतात. सगळं सुरळीत असताना पत्रकार या बातम्या लावून सामाजिक वातावरण कुलूषित करत आहेत. अवैध धंदे करणारे समाजसुधारक आणि पोलिस यांच्यातला सलोखा गरज नसताना बिघडवत आहेत. समाजात जर शांतता हवी असेल तर या दोघांच्यात सलोखा असायलाच हवा ना ? कुठे हाफ मर्डर झाला, कुठे ...