पोस्ट्स

आमदार कीर्ती कुमार भांगडिया यांच्या हस्ते सईक्लिनिक व एकविरा मेडिकल चे उद्घाटन

इमेज
भिसी ---चिमूर तालुक्यातील भिसी येथे भट्टी चौक, बाजार रोड, या वाडॅ मध्ये डॉक्टर.व मेडीकल गरज होती,ति समस्या वाडाॅत डॉ, हितेश प्रभाकर पंधरे (BAMS) व सौ. कल्याणी हितेश पंधरे (D.Pharm) यांच्या सई क्लिनिक व एकविरा मेडिकल स्टोर्सच्या स्वरुपात सोडवली असुन त्या उद्घाटन सोहळ्या निमित्त भेट दिली आणि या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून आरोग्यसेवेसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजयुमो जिल्हा सचिव संदीप पिसे, जि.प. सर्कल प्रमुख निलेश गभणे, गोपाल बलदुवा,आकास ढबाले, गणेश गभणे,किशोर मुंगले ईश्वर ठोंबरे , भाऊराव ठोंबरे, धनश्याम येनुरकर ,मनोहर वानखेडे,देवेन्द्र व वैध , पञकार आंनद भिमटे,पंकज मिश्रा, अरुण भोले,माजी सैनिक गिरिष ठोंबरे, शहराती अन्य मान्यवर मंडळी बहुसंख्येनी उपस्थित होते.

वैनगंगेच्या उपप्रवाहावर आज झाला मोठ्या पुलाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

इमेज
जुनगाव ला पुन्हा ७० कोटीचा दुसरा पूल देणार-पालकमंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री वने व मत्स्य व्यवसाय मंत्री यांचे जुनगाव येथे आश्वासन वैनगंगेच्या उपप्रवाहावर आज झाला मोठ्या पुलाचा भूमिपूजन सोहळा संपन्न जुनगाव: प्रतिनिधी तालुक्याचे व जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या व सतत पुरामध्ये अडकत असलेल्या जुनगावला लहान व बुडीत पुलामुळे अनेक त्रास सहन करावा लागत होता. यासाठी या नदीवर मोठा पूल व्हावा आणि जुनगाव वासियांची कायमची समस्या सुटावी यासाठी जून गावातील ग्रामपंचायत तिचे उपसरपंच राहुल भाऊ पाल यांनी अथक प्रयत्न करून पालकमंत्री तथा वने व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना वारंवार मागणी करून या पुलाला मंजुरी मिळवून दिली. राहुल पाल आणि गावकऱ्यांच्या हाकेला सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी ओ दिला असून त्यांच्याच प्रयत्नातून या छोट्या नदीवरील बुळीत पुला ऐवजी आता मोठ्या पुलाचा भूमिपूजन कार्यक्रम दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाला.       याप्रसंगी जूनगाववासीय जनतेला मार्गदर्शन करताना सुधीर भाऊंनी सांगितले की या नदीवरील पूल तर पूर्णत्वास येईलच, परंतु गडचिरोली चामोर्शी हा सरळ मार्ग ...

"जागतिक पॅथॉलॉजी दिना निमीत्त श्री अनिल बिडकर यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा"

इमेज
जगदीश का. काशिकर,  कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नांदेड: दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागतिक पॅथॉलॉजी दिवस साजरा केला जातो. हा दिवस आपल्या समाजातील डॉक्टर्स तसेच सर्वसामान्य माणसांना पॅथॉलॉजी विषया बद्दल माहिती आणि जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. पॅथॉलॉजी ही एक मॉडर्न मेडिसिन ची स्पेशालिटी आहे ज्यामध्ये आपण रोगांचे निदान करण्यासोबतच त्याच्या मूळ कारणाशी पोहोचू शकतो. पॅथॉलॉजी शास्त्रामध्ये जे डॉक्टर पदव्युत्तर शिक्षण घेतात त्यांना पॅथॉलॉजिस्ट म्हणतात. पॅथॉलॉजिस्ट बनण्यासाठी एमबीबीएस नंतर तीन ते पाच वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण घ्यावे लागते. पॅथॉलॉजिस्ट हे आपल्या शरीरातील रक्त, लघवी ,मल ,थुंकी, कोषांचे द्रव्य आणि गाठींची तपासणी करून रोगनिदान करतात. पॅथॉलॉजी लॅब मध्ये जरी आपल्याला मोठे मोठे मशीन दिसत असले आणि असा समज असला की नमुना मशीन मध्ये घातला की रिपोर्ट तयार होतात तर असं नसून लॅबोरेटरी मॅनेजमेंट ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे. त्याला उत्तम दर्जाच्या मशीन ,टेस्ट टाकायला क्वालिफायड तंत्रज्ञ (टेक...

कुर्झा प्रभागात "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" शिबीर संपन्न

इमेज
ब्रम्हपुरी :- महाराष्ट्र राज्य सरकारकडून राज्याच्या आरोग्य विभागामार्फत "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" हे महिलांसाठी एक खास अभियान राज्यभर राबवलं जातं आहे. आज दि. 11/11/22 रोजी ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी तसेच प्रकाशभाऊ खोब्रागडे व क्रिष्णा वैद्य यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्ष्मी नगर कुर्झा प्रभागांमध्ये "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या मोहिमेअंतर्गत महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर शिबिरामध्ये एकूण 382महिलांची तपासणी केली असून त्यात 13 महिला ह्या उच्च रक्तदाब 5 महिला मधुमेह व 2 महिला ह्या हृदय रोग या आजाराच्या निदानात्मक झाल्या. तसेच महिलांची कर्करोगाची सुद्धा तपासणी करण्यात आली असून विशेषता कर्करोगावर मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.विद्यानगर, महालक्ष्मी नगर व वाल्मिकी नगर क्षेत्रातील नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबिराला श्री प्रकाशभाऊ खोब्रागडे व श्री क्रिष्णा भाऊ वैद्य हे स्वतःजातीने उपस्थित होते.तसेच ग्रा.रु.ब्रम्हपुरी येथील डॉ. सचिन मेंढे सर, डॉ. खरकाटे मॅडम, अंजिरा आंबीलढुके (समुपदेशक), प्राजक्ता फुलझेले ,(समुपदेशक) तसेच सोनाली पानसे इ...

महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घ्यावे_ 🔹भिम टायगर सेनेची मागणी

इमेज
🔹 सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या शासनाच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणार . गडचिरोली / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील विविध विभागात हजारो कर्मचारी कंत्राटी पध्दतीने अल्पशा मानधनावर  मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. अल्पशा मानधनावर काम करीत असतांना  आर्थिक  टंचाईमुळे  अनेकविध समस्यांना तोंड द्यावे लागते.  यापुर्वी अनेक संघटनेच्या वतीने   समान काम.. समान वेतन मिळावे यासाठी शासनाच्या दरबारी निवेदन देऊन  मोर्चे, आंदोलन केली. परंतु  झोपेचे सोंग घेतलेल्या आणि केवळ  जनतेला आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या महाराष्ट्र शासनाने अजूनही दखल घेतली नाही.  समान काम समान वेतन मिळावे  असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे  न्यायमूर्ती  जे. एस. केहर    आणि न्यायमूर्ती  एस. के. बोबडे   यांच्या खंडपीठाने दिले आहे. तरीही  आरोग्य अभियान  सहसंचालक  विजय  कंदेवाड  यांनी अधिकाराचा  गैरवापर करून आणि चुकीचे अभिप्राय लिहून, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर  हेतूपुरस्सरपणे अन्याय करण्यासाठी शासनाची  दिशाभूल करीत तसेच भारतीय राज्यघटनेच्या आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान केलेला आहे....

जुनगाव येथे स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी, शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळा राघोजी भांगरे यांची जयंती साजरी

इमेज
तालुका प्रतिनिधी      ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या राघोजी भांगरे यांची जयंती आज 08 नोव्हेंबर 2022 रोजी पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथे "बिरसा क्रांती दल" शाखा जुनगाव च्या वतीने साजरी करण्यात आली.      याप्रसंगी बिरसा क्रांती दलाचे सर्व पदाधिकारी सदस्य व सर्व समाजातील समाज बांधव उपस्थित होते. गोरगरिबांवर भरमसाठ कर्ज सावकारी करणाऱ्यांनी दिली. व सावकारी फास शेतकऱ्यांच्या गळ्याभावती आवळला गेला. या विरोधात राघोजी भांगरे यांनी लढा उभारला. आणि ब्रिटिशांना सडोकी पडू करून सोडले. त्यांचेवर राजद्रहाचा खटला भरला गेला. आणि कुटील इंग्रजांनी त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी त्याकाळी वकीलही मिळू दिला नव्हता. त्यांना आद्य क्रांतिकारक अशी पदवी बहाल करण्यात आली. राघोजी भांगरे यांनी भिल्ल आदिवासी जमातीच्या टोळ्या उभा केल्या. त्यांच्या या टोळक्यात अनेक पराक्रमी तरुण सामील झाले. सन1838 साली रतनगड आणि संघर्ष किल्ल्यांच्या परिसरात राघोजी भांगरे यांचं बंड उभारलं गेलं. आजही त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले जातात. मात्र सरकारी दरबारी उशिरा त्यांची दखल घेतली गेली. ही खंत सर्वांनाच आहे.     166...

संदीप विलास नागापुरे या तरुणाचा बोगस डॉक्टरच्या इलाजामुळे मृत्यू!

इमेज
जुनगाव :प्रतिनिधी, बोगस आणि झोला छाप डॉक्टरांनी सर्वत्र धुमाकूळ माजवला आहे आणि बोगस इलाजामुळे अनेकांचे जीव जात आहेत तर अनेक वेगवेगळ्या व्याधीने ग्रस्त होत आहेत. मात्र प्रशासन या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यास धजत नसल्यामुळे बोगस डॉक्टरच्या भरोशावर लाखो करोडो ची माया या बोगस डॉक्टरांनी जमविली आहे. अशीच एक घटना मूल तालुक्यातील बोंडाळा येथे उघडकीस आली असून शेजारीच असलेल्या नांदगाव येथे उपचारासाठी दुचाकी वर भावासोबत बसून गेलेला संदीप विलास नागापुरे हा मृत होऊनच घरी परतला. या घटनेबाबत सविस्तर असे की, बेंबाळ पोलीस चौकीच्या हद्दीत येणाऱ्या बोंडाळा (लहान) संदीप विलास नागापुरे याची प्रकृती बरी नसल्यामुळे त्याच्या भावाने त्याला दुचाकी वर बसवून त्याच्या आई समवेत नांदगाव येथील डॉक्टर देवकुमार बुधक यांच्या दवाखान्यात भरती केले. त्यानंतर डॉक्टरने सलाईन लावली काही वेळाने तो व्यक्ती म्हणजेच संदीप हा अजिबात निर्जीव पडला असल्याची त्याच्या भावाच्या लक्षात आले. मात्र डॉक्टरांनी त्याच्या भावाला मुल किंवा चंद्रपूर येथे घेऊन जाण्यास सांगितले. परंतु सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्या...