पोस्ट्स

कोल्हापूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्वतःच्या चितेची तयारी करुन वृद्ध दाम्पत्याची

इमेज
कोल्हापूर / जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्वतःच्या चितेची तयारी करुन एका वृद्ध दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वेतवडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आजारपणास कंटाळून दाम्पत्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊस उचललं आहे. महादेव पाटील आणि द्वारकाबाई पाटील अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावं आहेत. आत्महत्येपूर्वी या वृद्ध दाम्पत्यानं चितेला लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करुन ठेवली होती. आजारपणास कंटाळून या दाम्पत्याने गळफास घेऊन जीवन संपल्याची माहिती मिळत आहे.

पोलीस कारवाईच्या भीतीने दोन तरुणांनी घराच्या स्लॅब वरून उडी घेतली, एकाचा जागीच मृत्यू

इमेज
पोलीस कारवाईच्या भीतीने दोन तरुणांनी घराच्या स्लॅब वरून उडी घेतली, एकाचा जागीच मृत्यू कोल्हापुर: शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर कारवाईच्या भीतीने जुगार खेळणाऱ्या दोन तरुणांनी इमारतीवरुन उडी मारली. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण जखमी झाला आहे. साहिल मिनेकर असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तर दत्तात्रय देवकुळे या तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. राजेंद्रनगरमध्ये परिसरात काल (18 जून) ही घटना घडली. राजेंद्रनगरमध्ये नेमकं काय घडलं? कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरातील एका दुमजली इमारतीमध्ये काही तरुण रविवारी रात्री जुगार खेळत होते. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री अकराच्या सुमारास तिथे छापा टाकला. पोलिसांना पाहताच तरुणांची पळापळ झाली. पोलीस पकडतील या भीतीने साहिल आणि दत्तात्रय या दोन तरुणांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन थेट खाली उडी मारली. मात्र दगडावर डोके आपटल्याने साहिल मिनेकरचा जागीच मृत्यू झाला, तर दत्तात्रय देवकुळे हा तरुण जखमी झाला. पोलिसांनी साहिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी 'सीपीआर'मध्ये प...

कोल्हापुरात तणावपूर्ण वातावरण, परंतु परिस्थिती नियंत्रणात । कोल्हापुरातील इंटरनेट सेवा बंद, दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

इमेज
कोल्हापूर : सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापुरात आज, बुधवार (दि.७) सकाळपासून मोठा तणाव निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्याकडून अनेक दुकानगाळे, हातगाड्या, दुचाकी तसेच काही परिसरात मोठी तोडफोड केली आहे. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रुधुराच्या कांड्याही फोडल्या आहेत. तसेच दगडफेक करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशातच सोशल मीडियावरील अफवावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरात एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून लोक सुरक्षेसाठी दूरसंचार सेवा (इंटरनेट) तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आली. जिल्ह्यातील इंटरनेट सेवा आज, ७ जून सायंकाळपासून ते ८ जून 2023 रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ३१ तासांच्या कालावधीकरिता खंडीत करण्याचे आदेश गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी दिले. खबरदारीचा उपाय म्हणून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा आदेश पारित करण्यात आला असल्याची...

आज 'कोल्हापूर बंद'

इमेज
कोल्हापूर : औरंगजेबचा संदर्भ देऊन काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. आक्रमक झालेल्या हिंदुत्वादी संघटनांनी शहरातील काही भागांत तोडफोड केल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज 'कोल्हापूर बंद'ची हाक दिली आहे. तसंच या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले असून आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. कोल्हापुरातील काही तरुणांनी औरंगजेबाविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दुपारी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या दारात जमा झाले. तिथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्या समाजकंटकांना तातडीने अटक करून कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी दोघांना त...