आत्ताची बिग ब्रेकिंग न्यूज:
कर्जापाई बोंडाळा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
मुल तालुका प्रतिनिधी विजय जाधव....
मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेंबाळ पोलीस दुरुक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बोंडाळा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने आज दिनांक 14 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जीवनदास नोमाजी पाल वय 45 वर्ष असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
कर्जाबाई बेजार झालेल्या या शेतकऱ्याने जमीन विकली होती. बँकेच्या कर्ज असल्याने तो मार्च अखेर कसा भरावा या विवंचनेत त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. घराच्या मागील शेतात आंब्याच्या झाडाला त्यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.
त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा नववा वर्ग,एक मुलगी सातवा वर्ग, आई भाऊ असा परिवार आहे. मुलाचा नुकताच नवोदय विद्यालयाकरिता नंबर लागला आहे मात्र मुलाचे यश पाहण्याचे सदैव या शेतकऱ्याला मिळाले नाही.
पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मुल येथे पाठविले आहे. पुढील तपास सुरू आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading