गावातील मुख्य रस्ता खोदून ठेवला! पंधरा दिवसापासून नागरिकांना फटका🖕 आचारसंहितेची धास्ती !शासकीय निधीचा दुरुपयोग-उत्कृष्ट सिमेंट काँक्रीट रस्त्याला फोडून ठेवले


गावातील मुख्य रस्ता खोदून ठेवला! पंधरा दिवसापासून नागरिकांना फटका🖕

आचारसंहितेची धास्ती !शासकीय निधीचा दुरुपयोग-उत्कृष्ट सिमेंट काँक्रीट रस्त्याला फोडून ठेवले

पोंभुर्णा: तालुक्यातील जुनगाव येथील गावातील मुख्य सिमेंट रस्ता नवीन रस्त्याच्या बांधकामासाठी ठेकेदाराने खोदून ठेवला असल्याने पंधरा दिवसापासून गावातील रहदारी ठप्प झाली आहे.



लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला आणि आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मंजूर असलेली कामे सुरू करून ठेवण्यात आले मात्र ठेकेदाराच्या तिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी या रस्त्यावरील वाहतूक पंधरा दिवसापासून ठप्प झाली असून दुसऱ्या मार्गाने मार्गक्रमण सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने त्वरित काम सुरू करून रस्ता ताबडतोब सुरू करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू